“मुख्यमंत्री जी... तडफडून मरणं काय असतं, हे जरा समजून घ्याच”
By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2021 04:24 PM2021-04-04T16:24:11+5:302021-04-04T16:26:08+5:30
राज्यातील कोरोनाची स्थिती, रक्ताचा तुटवडा, बेड्स व ऑक्सिजनची कमतरता यांवरून ठाकरे सरकारवर टीका करण्यात आली आहे.
मुंबई : गेल्या काही दिवसांमध्ये कोरोनाचा कहर होताना पाहायला मिळत आहे. नव्या वर्षातील सर्वांत मोठ्या कोरोना रुग्णवाढीचा उच्चांक नोंदवला गेला आहे. यातच राज्यात कोणत्याही क्षणी लॉकडाऊन लावला जाईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. राज्यातील रूग्णालयांमध्ये बेड्सची उपलब्धता कमी असल्याने, अनेक रूग्णांचे मोठ्या प्रमाणावर हाल सुरू आहेत. यावरून भाजपने ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली आहे. (bjp slams on thackeray govt)
भारतीय जनता पक्षाने (bjp) एकामागून एक ट्विट करत राज्यातील कोरोना परिस्थिती, रुग्णांचे होणारे हाल, लॉकडाऊनची टांगती तलवार यांसारख्या अनेक मुद्द्यांवरून ठाकरे सरकारवर जोरदाल हल्लाबोल केला आहे. राज्यात कोरोनाग्रस्त रुग्णांचे प्रचंड हाल होताना दिसत आहे. राज्याच्या अनेक भागांमधून ४-५ तास प्रवास करूनही रुग्णांना बेड्स मिळणं अशक्य झालं आहे. रुग्णांचे होणारे हाल पाहून ठाकरे सरकारने आतातरी काही ‘हाल’चाल करावी, असे भाजपने ट्विटमध्ये म्हटले आहे.
लॉकडाऊन करू नका; १० मागण्यांच्या निवेदनासह सदाभाऊ खोतांनी घेतली राज्यपालांची भेट
ठाकरे सरकारच्या हलगर्जीमुळे राज्यात कोरोनाचा विस्फोट झालाय... ऑक्सिजन सिलेंडरची कमतरता भासेल अशी भीती व्यक्त होत होतीच.नाशिकमध्ये बाबासाहेब कोळे या कोरोनाग्रस्ताचा ऑक्सिजन न मिळाल्यानं मृत्यू झाला. त्यांच्या पत्नीने पत्राद्वारे मांडलेली व्यथा तुमच्या जिव्हारी लागू दे, @OfficeofUTpic.twitter.com/sGNDNgPJSf
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) April 4, 2021
पत्राद्वारे मांडलेली व्यथा तुमच्या जिव्हारी लागू दे
दुसऱ्या एक ट्विटमध्ये, ठाकरे सरकारच्या हलगर्जीमुळे राज्यात करोनाचा विस्फोट झालाय. ऑक्सिजन सिलेंडरची कमतरता भासेल अशी भीती व्यक्त होत होतीच. नाशिकमध्ये बाबासाहेब कोळे या करोनाग्रस्ताचा ऑक्सिजन न मिळाल्यानं मृत्यू झाला. त्यांच्या पत्नीने पत्राद्वारे मांडलेली व्यथा तुमच्या जिव्हारी लागू दे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, अशी टीका करण्यात आली आहे.
राज्यात कोरोनाग्रस्त रुग्णांचे प्रचंड हाल होताना दिसत आहे. राज्याच्या अनेक भागांमधून ४-५ तास प्रवास करूनही रुग्णांना बेड्स मिळणं अशक्य झालं आहे. रुग्णांचे होणारे हाल पाहून ठाकरे सरकारने आतातरी काही 'हाल'चाल करावी.@OfficeofUTpic.twitter.com/VyoaZQJ801
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) April 4, 2021
“रोजगार बुडणाऱ्यांना भरपाई द्या, नंतरच लॉकडाऊन करा आणि जमत नसेल तर...”
आणखी एक संकट म्हणजे रक्ताचा प्रचंड तुटवडा
तिसऱ्या ट्विटमध्ये, राज्यावर आधीच करोनाचं सावट आहे. त्यात आणखी एक संकट म्हणजे रक्ताचा प्रचंड तुटवडा. ७ ते ८ दिवस पुरेल इतकाच रक्तसाठा राज्यात शिल्लक आहे. मात्र हा तुटवडा होईपर्यंत ठाकरे सरकार काय करत होतं? याचं उत्तर त्यांनी द्यावं, असा हल्लाबोल भाजपने केला आहे.
मुख्यमंत्री @OfficeofUT केवळ भाषण आणि सूचना देण्यात व्यग्र आहेत. मात्र राज्यातील वैद्यकीय सुविधा वाढवण्याचा त्यांना विसर पडलाय. अनेक रुग्णालयांमध्ये डॉक्टर्स, नर्सेस, औषधे, बेड्स नाहीत. त्याबद्दल काही ठोस पावलं उचलण्याची तयारी ते करू शकले असते... पण त्यांनी ती केली नाही...! pic.twitter.com/zPrcPa62J0
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) April 4, 2021
“प्लेगच्या साथीवेळी रँडने लोकांवर अत्याचार केले, तसा अनुभव राज्यातील जनता सध्या घेतेय”
मुख्यमंत्री केवळ भाषण आणि सूचना देण्यात व्यग्र
आणखी एका ट्विटमध्ये, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे केवळ भाषण आणि सूचना देण्यात व्यग्र आहेत. मात्र, राज्यातील वैद्यकीय सुविधा वाढवण्याचा त्यांना विसर पडलाय. अनेक रुग्णालयांमध्ये डॉक्टर्स, नर्सेस, औषधे, बेड्स नाहीत. त्याबद्दल काही ठोस पावलं उचलण्याची तयारी ते करू शकले असते. पण त्यांनी ती केली नाही! ठाकरे सरकार किती दिवस हा नन्नाचा पाढा?, अशी विचारणा भाजपाकडून करण्यात आली आहे.