'बाप बाप होता है, बेटा बेटा होता है!' सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंना खोचक टोला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2018 11:30 AM2018-06-12T11:30:02+5:302018-06-12T13:50:06+5:30

या निवडणुकीत मला 'घड्याळ' असलेल्या अनेक हातांनी मदत केली.

BJP Suresh dhas take dig at Dhananjay Munde after victory in Vidhan Parishad Election | 'बाप बाप होता है, बेटा बेटा होता है!' सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंना खोचक टोला

'बाप बाप होता है, बेटा बेटा होता है!' सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंना खोचक टोला

Next

बीड: विधानपरिषद निवडणुकीत राष्ट्रवादीच्या अशोक जगदाळे यांच्याविरुद्ध आश्चर्यकारकरित्या विजय मिळवल्यानंतर भाजपाचे विजयी उमेदवार सुरेश धस यांनी धनंजय मुंडेंना खोचक टोला लगावला. तुमचा आजचा विजय धनंजय मुंडेंना दिलेला धक्का आहे का, असा प्रश्न त्यांना प्रसारमाध्यमांकडून विचारण्यात आला. त्यावेळी धस यांनी 'बाप बाप होता है, बेटा बेटा होता है', असे विधान करत धनंजय यांना अप्रत्यक्षपणे खोचक टोला लगावला.

या निवडणुकीत मला 'घड्याळ' असलेल्या अनेक हातांनी मदत केली. राष्ट्रवादी राष्ट्रवादीने मतांसाठी अनेक नगरसेवकांना स्मार्ट वॉच, किचेन, आयफोन वाटले होते. तरीही त्यांचा पराभव झाला. त्यामुळे आजचा विजय म्हणजे जनशक्तीने धनशक्तीवर मिळवलेला विजय आहे, असे धस यांनी म्हटले. 

या निवडणुकीत १००५ मतदारांपैकी १००४ मतदारांनी मतदानात भाग घेतला होता. यापैकी 527 मतदार काँग्रेस-राष्ट्रवादीचे होते. तर भाजपाकडे तब्बल 100 मते कमी होती. मात्र, तरीही मतमोजणीच्या सुरुवातीच्या फेरीपासूनच सुरेश धस यांनी आश्चर्यकारकरित्या आघाडी घेतली व ती शेवटपर्यंत आणखी वाढवत नेली. त्यांना एकूण 526 मते मिळाली तर राष्ट्रवादीच्या अशोक जगदाळेंना 452 मते मिळाली. याशिवाय, 25 मते तांत्रिक कारणामुळे बाद ठरवण्यात आली. याशिवाय, एकाने मतदाराने नोटासाठी मतदान केले.

Web Title: BJP Suresh dhas take dig at Dhananjay Munde after victory in Vidhan Parishad Election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.