‘भाजप-ताराराणी आघाडीवर शिक्कामोर्तब’

By admin | Published: July 27, 2015 12:37 AM2015-07-27T00:37:16+5:302015-07-27T00:37:16+5:30

कोल्हापूर महापालिकेचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावून कोल्हापूर शहराचा विकास करण्यासाठी भाजपने निर्धार केला असून यासाठी उपलब्ध असणाऱ्या

'BJP-Tararani frontier' | ‘भाजप-ताराराणी आघाडीवर शिक्कामोर्तब’

‘भाजप-ताराराणी आघाडीवर शिक्कामोर्तब’

Next

कोल्हापूर : कोल्हापूर महापालिकेचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावून कोल्हापूर शहराचा विकास करण्यासाठी भाजपने निर्धार केला असून यासाठी उपलब्ध असणाऱ्या पर्यायांपैकी चांगला पर्याय म्हणून ताराराणी आघाडीबरोबर युती केल्याची माहिती पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली. शिवसेनेला आघाडीत सामावून घेण्याबाबत सध्या तरी विचार नसून राजकारणात शेवटपर्यंत काही सांगता येत नाही, असे सांगत शिवसेनेशी आघाडीबाबत त्यांनी संदिग्धता कायम राखली.
मंत्री चंद्रकांतदादा पाटील म्हणाले, १८ ते २० वर्षे ताराराणी आघाडीची सत्ता होती, त्यांनी अनेक प्रश्न मार्गी लावण्याचे प्रयत्न केले तर काही अपूर्ण राहिले आहेत. राज्यासह केंद्रात भाजपची सत्ता आहे, कोल्हापूर शहराचे प्रलंबित प्रश्न कायमचे निकालात काढण्यासाठी महापालिकेवर सत्ता असणे गरजेचे आहे. निवडणुकीतील विरोधकांची तयारी पाहता कोणाला तरी सोबत घेऊन एकत्रित सामोरे जाणे गरजेचे होते. (प्रतिनिधी)

Web Title: 'BJP-Tararani frontier'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.