“शरद पवार म्हणजे जपानी गुडिया, प्रत्येकाला वाटते की...”; नितीन गडकरींचा खोचक टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2023 11:32 AM2023-07-31T11:32:03+5:302023-07-31T11:36:34+5:30

Nitin Gadkari And Sharad Pawar: भाजप कार्यकर्त्यांना संबोधित करताना नितीन गडकरी यांनी थेट शरद पवारांना खोचक टोला लगावला.

bjp union minister nitin gadkari taunt ncp chief sharad pawar in party worker program | “शरद पवार म्हणजे जपानी गुडिया, प्रत्येकाला वाटते की...”; नितीन गडकरींचा खोचक टोला

“शरद पवार म्हणजे जपानी गुडिया, प्रत्येकाला वाटते की...”; नितीन गडकरींचा खोचक टोला

googlenewsNext

Nitin Gadkari And Sharad Pawar: शिवसेनेत ऐतिहासिक बंडखोरी झाल्यानंतर वर्षभरातच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठा भूकंप झाल्याचे पाहायला मिळाले. अजित पवार यांनी सत्तेत सहभागी होत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यानंतर शरद पवार यांनी पुन्हा पक्षबांधणीवर भर दिल्याचे सांगितले जात आहे. केंद्रीय मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांनी शरद पवार यांच्यावर खोचक शब्दांत टीका केली. 

एका कार्यक्रमात भाजपच्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना नितीन गडकरी यांनी शरद पवार यांच्यावर निशाणा साधला. यावेळी भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते. जपानी गुडिया जशी प्रत्येकाकडे बघून डोळा मारते तसेच काहीसे शरद पवार यांचे आहे. कार्यकर्त्याला असेच वाटते की, साहेब आपल्याकडे बघून बोलत आहेत, कामाला लागा. पण त्यानंतर तिकीट मात्र भलत्यालाच मिळते, असे गडकरी यांनी म्हटले आहे. 

नेत्यांना चॉकलेट वाटण्याशिवाय पर्याय नसतो

शरद पवार हे म्हणजे जपानी गुडिया, प्रत्येकाला वाटते की, ती आपल्याकडे बघूनच डोळा मारत आहे, असा टोला लगावताना आपण नेहमी आपले काम व्यवस्थित करावे. मिळाले तर बोनस नाही मिळाले तर दु:ख नाही. पण नेत्यांना चॉकलेट वाटण्याशिवाय पर्याय नसतो, असे मिश्किल भाष्य गडकरी यांनी केले. नितीन गडकरींनी शरद पवारांवर केलेल्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. नितीन गडकरींच्या या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेसकडून कसे उत्तर दिले जाते, याकडे लक्ष लागले आहे. 

दरम्यान, शरद पवारांनी आता भाजपाबरोबर येण्यास नकार दिला आहे. पण कालांतराने विचार बदलत असतात. राष्ट्रवादी पक्ष एकच आहे. काही वेळ जाऊ द्यावा लागतो. देश कल्याणासाठी काय केले पाहिजे? असा विचार कधी ना कधी त्यांच्याकडून होईलच. त्यांची भूमिका आज वेगळी असली तरी जीवनामध्ये कालांतराने काही ना काही वेगळेपण येत असते. राष्ट्रवादीचे सर्वच आमदार आणि खासदार हे अजित पवारांबरोबर आहेत. त्यामुळे कालांतराने शरद पवारही याचा विचार करतील. राज्य आणि देशाच्या हितासाठी सर्वच लोक एकत्र आले पाहिजे. शेवटी राष्ट्रहीत महत्त्वाचे आहे, असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले होते. 


 

Web Title: bjp union minister nitin gadkari taunt ncp chief sharad pawar in party worker program

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.