भाजपाही लोकसभा, विधानसभा निवडणुका स्वबळावरच लढवेल- आशिष शेलार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2018 04:41 PM2018-01-23T16:41:17+5:302018-01-23T16:42:28+5:30

2019च्या विधानसभा, लोकसभा निवडणुका शिवसेना स्वबळावर लढवणार आहे. शिवसेनेच्या कार्यकारिणीनं या ठरावाला मंजुरी दिल्यानंतर भाजपानं शिवसेनेवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला आहे.

BJP will fight Lok Sabha, Vidhan Sabha elections on self: Ashish Shelar | भाजपाही लोकसभा, विधानसभा निवडणुका स्वबळावरच लढवेल- आशिष शेलार

भाजपाही लोकसभा, विधानसभा निवडणुका स्वबळावरच लढवेल- आशिष शेलार

Next

मुंबई -  2019च्या विधानसभा, लोकसभा निवडणुका शिवसेना स्वबळावर लढवणार आहे. शिवसेनेच्या कार्यकारिणीनं या ठरावाला मंजुरी दिल्यानंतर भाजपानं शिवसेनेवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला आहे. लोकसभा, विधानसभा निवडणुका भाजपाही स्वबळावर लढवण्यात तयार असल्याचे सूतोवाच भाजपाचे मुंबई अध्यक्ष आणि आमदार अॅड. आशिष शेलार यांनी केलं आहे.

ते म्हणाले, खरंतर आमची युती करण्याची भूमिका होती. पण शिवसेना स्वबळाची भाषा करत असल्यास 2019च्या लोकसभा, विधानसभा निवडणुकाही भाजपा स्वबळावर लढवण्यास तयार आहे. परंतु शिवसेनेनं स्वबळावर लोकसभा निवडणूक लढण्यास त्यांचेच नुकसान होणार आहे, असंही आशिष शेलार यांनी स्पष्ट केलं आहे. याच मुद्द्यावरून भाजपाचे सहयोगी खासदार संजय काकडे यांनी शिवसेनेला खडे बोल सुनावले आहेत.

लोकसभा आणि विधानसभा निवडणुका स्वतंत्र लढल्याने शिवसेनेचं नुकसानच होईल. लोकसभेला शिवसेनेचे केवळ 5 तर भाजपाचे 28 खासदार निवडून येतील, असा अंदाज भाजपाचे सहयोगी खासदार संजय काकडे यांनी वर्तवला आहे. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका स्वतंत्र लढणार असल्याची घोषणा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज केली.

काकडे म्हणाले, उद्धव ठाकरेंनी आज निवडणुका स्वतंत्रपणे लढण्याची घोषणा केली. यामुळे सेनेची वाढ होणार नसून नुकसानच होईल. लोकसभा आणि विधानसभा निवडणुका स्वतंत्रपणे लढल्यास, मोठा भाऊ भाजपाच राहील. मोदींच्या करिष्म्यामुळेच शिवसेनेचे उमेदवार निवडून आले. लोकसभा स्वतंत्र लढलो तर भाजपाचे 28 आणि शिवसेनेचे 5 खासदार निवडून येतील. शिवाय विधानसभा स्वतंत्रपणे लढल्यास भाजपाचे 165 आमदार निवडून येतील, असं भाकितही काकडेंनी वर्तवलं आहे. 

2019च्या दोन्ही निवडणुका स्वबळावर लढू- उद्धव ठाकरे
शिवसेना 2019 च्या विधानसभा, लोकसभा निवडणूका स्वबळावर लढवणार आहे. शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी मांडलेल्या ठरावाला कार्यकारिणीत मंजुरी मिळाली आहे. वरळीच्या सरदार वल्लभभाई पटेल क्रीडा संकुलात राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक पार पडल्यानंतर हा ठराव मांडण्यात आला. यावेळी एकमताने हा ठराव मंजूर करण्यात आला. 

दरम्यान ठराव मांडले जाण्याआधी पार पडलेल्या बैठकीत युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची नेतेपदी निवड करण्यात आली. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची शिवसेनेच्या नेतेपदी निवड करण्यात आली. शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक पार पडली असून या बैठकीत आदित्य ठाकरेंच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे औचित्य साधून पार पडलेल्या या बैठकीत शिवसेनेच्या नेत्यांची नावे जाहीर करण्यात आली. यावेळी आदित्य ठाकरे यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आली.

Web Title: BJP will fight Lok Sabha, Vidhan Sabha elections on self: Ashish Shelar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.