श्रीमंतीसह गुन्हेगारीमध्येही भाजपाचीच आघाडी

By admin | Published: May 30, 2017 04:16 AM2017-05-30T04:16:48+5:302017-05-30T04:16:48+5:30

पनवेल महापालिका निवडणुकीमध्ये एकहाती सत्ता मिळविणारा भाजपा श्रीमंतीसह गुन्हेगारीमध्येही आघाडीवर आहे. निवडणूक जिंकलेल्या

BJP's alliance with criminality in criminality | श्रीमंतीसह गुन्हेगारीमध्येही भाजपाचीच आघाडी

श्रीमंतीसह गुन्हेगारीमध्येही भाजपाचीच आघाडी

Next

नामदेव मोरे/लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : पनवेल महापालिका निवडणुकीमध्ये एकहाती सत्ता मिळविणारा भाजपा श्रीमंतीसह गुन्हेगारीमध्येही आघाडीवर आहे. निवडणूक जिंकलेल्या ६० पैकी ४० कोट्यधीश त्यांचेच असून, गुन्हे दाखल असलेल्या १७ पैकी १५ नगरसेवक भाजपाचेच असल्याचे सर्वेक्षणामध्ये स्पष्ट झाले आहे. काँगे्रसच्या मंजुळा कातकरी या सर्वात कमी संपत्ती असलेल्या नगरसेविका असल्याचेही महाराष्ट्र इलेक्शन वॉच व असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म संस्थेने केलेल्या सर्वेक्षणात स्पष्ट झाले आहे.
महापालिकेच्या निवडणुकीमध्ये सर्वपक्षीय उमेदवारांनी प्रचंड पैसा खर्च केल्याचे निदर्शनास आले होते. पनवेलमधील काही प्रभागामध्ये एका मतासाठी २ ते ४ हजार रुपयांचे वाटप केल्याची चर्चा आहे. याशिवाय काही ठिकाणी रॅली व नियमित प्रचाराला येणाऱ्यांनाही आर्थिक मोबदला देण्यात येत होता. उमेदवारी देतानाही संबंधितांची पैसे खर्च करण्याची तयारी तपासून पाहिली जात होती. निकालामध्येही आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेले उमेदवार जिंकल्याचे स्पष्ट झाले आहे. या ७८ पैकी तब्बल ६० उमेदवार हे कोट्यधीश आहेत. उर्वरित १८ पैकी ९ उमेदवारांची संपत्ती ५० लाखपेक्षा जास्त आहे. चार जणांची ४० लाखापेक्षा जास्त व तिघांची १५ ते २५ लाखापर्यंत संपत्ती आहे. काँगे्रसच्या मंजुळा गजानन कातकरी यांची सर्वात कमी ६ हजार एवढीच संपत्ती आहे. त्यांच्याबरोबर भाजपाच्या आरती नवघरे व महादेव मधे यांची अनुक्रमे १ लाख ९२ हजार व २ लाख ८३ हजार एवढी संपत्ती आहे. श्रीमंत नगरसेवकांमध्येही भाजपाचीच आघाडी आहे. ६० कोट्यधीशांपैकी ४० भाजपाचे नगरसेवक असल्याचे स्पष्ट झाले आहे. शेतकरी कामगार पक्षाचे १७, राष्ट्रवादीचे २ व काँगे्रसचा १ उमेदवार कोट्यधीश आहे.

शिक्षणाला गौण स्थान
गुन्हेगारीमध्येही भाजपाच्याच नगरसेवकांचा अग्रक्रमांक आहे. निवडून आलेल्या १७ जणांवर गुन्हे दाखल असून, त्यामध्ये १५ जण भाजपाचे आहेत. उर्वरित दोन शेकापचे आहेत. महापालिका निवडणुकीमध्ये मतदारांनीही शिक्षणाला गौण स्थान दिले असल्याचेही महाराष्ट्र इलेक्शन वॉच व असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्मच्या पाहणीमध्ये स्पष्ट झाले.



गुन्हे दाखल असलेले उमेदवार
पक्षसंख्याटक्केवारी
भाजपा१५२९
शेकाप२९
इतर००
पक्षनिहाय कोट्यधीश उमेदवार
पक्षसंख्याटक्केवारी
भाजपा४०७८
शेकाप१७७४
राष्ट्रवादी२१००
काँगे्रस१५०



सर्वाधिक श्रीमंत उमेदवार
नावपक्षसंपत्ती (कोटी)
परेश ठाकूरभाजपा९५.४७
रामजी बेराभाजपा२७.३९
प्रीतम म्हात्रेशेकाप२६.७१
मनोज भुजबळभाजपा२२.५४
राजेंद्रकुमार शर्माभाजपा२१.९५
चंद्रकांत सोनीभाजपा१४.८४
राजश्री वावेकरभाजपा१२.९९
अरविंद म्हात्रेशेकाप११.७१
अजीज पटेलशेकाप११.२१
शीतल केणीशेकाप१०.२४



सर्वात कमी उत्पन्न (एकूण मालमत्ता)
नावपक्षउत्पन्न
मंजुळा कातकरीकाँगे्रस६ हजार
आरती केतन नवघरेभाजपा१ लाख ९२ हजार
महादेव मधेभाजपा२ लाख ८३ हजार




वयोगटाप्रमाणे
जिंकलेले उमेदवार
वयोगटउमेदवार
२५ ते ३०११
३१ ते ४०३८
४१ ते ५०२१
५१ ते ६०७
६१ ते ७०१


शैक्षणिक पात्रता
शिक्षणसंख्या
पाचवी८
आठवी१८
दहावी७
बारावी१९
पदवी१३
पदव्युत्तर६
इतर४
माहिती ३
उपलब्ध नाही

उमेदवारांपैकी पाचवी पास झालेले ८, आठवी पास १८ व दहावीपर्यंत शिक्षण झालेले ७ जण जिंकून आले आहेत. ७८ पैकी १९ जण पदवी व पदव्युत्तर शिक्षण घेतलेले आहेत.

Web Title: BJP's alliance with criminality in criminality

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.