"वडिलांच्या नावावर मोठेपणा मिरविणारा नाकर्ता, अपयशी मुलगा आज फडणवीसांवर गरळ ओकतोय’’ भाजपाचा बोचरा वार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2023 08:19 PM2023-04-04T20:19:22+5:302023-04-04T20:23:37+5:30

BJP Criticize Uddhav Thackeray: वडिलांच्या नावावर मोठेपणा मिरविणारा नाकर्ता, अपयशी मुलगा आज कर्तबगारी सिद्ध करणाऱ्या देवेंद्र फडणवीसांवर गरळ ओकतोय, अशी टीका भाजपाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केली आहे. 

BJP's attack on Uddhav Thackeray, Keshav Upadhye Criticize Uddhav Thackeray | "वडिलांच्या नावावर मोठेपणा मिरविणारा नाकर्ता, अपयशी मुलगा आज फडणवीसांवर गरळ ओकतोय’’ भाजपाचा बोचरा वार

"वडिलांच्या नावावर मोठेपणा मिरविणारा नाकर्ता, अपयशी मुलगा आज फडणवीसांवर गरळ ओकतोय’’ भाजपाचा बोचरा वार

googlenewsNext

उद्धव ठाकरे यांनी ठाण्यात ठाकरे गटाच्या महिला कार्यकर्त्याला झालेल्या मारहाणीच्या मुद्द्यावरून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली होती. यावेळी त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फडतूस गृहमंत्री असा उल्लेख केल्याने भाजपानेउद्धव ठाकरेंविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. स्वत: देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर दिले आहे. दरम्यान, वडिलांच्या नावावर मोठेपणा मिरविणारा नाकर्ता, अपयशी मुलगा आज कर्तबगारी सिद्ध करणाऱ्या देवेंद्र फडणवीसांवर गरळ ओकतोय, अशी टीका भाजपाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केली आहे. 

उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना केशव उपाध्ये यांनी एक ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये उपाध्ये यांनी उद्धव ठाकरेंच्या एका विधानाचा हवाला दिला आहे. “माझ्या नावापुढे बाळासाहेबांचे नाव आहे म्हणून, नाहीतर मला काडीचीही किंमत नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले होते. आता स्वतःची लायकी आणि फडतूसपणा स्वतःच्या तोंडाने कबूल करणारा, वडिलांच्या नावावर मोठेपणा मिरविणारा नाकर्ता, अपयशी मुलगा आज कर्तबगारी सिद्ध करणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांच्यावर गरळ ओकतोय, असा टोला उपाध्ये यांनी लगावला आहे.

दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी केलेल्या  टीकेला प्रत्युत्तर देताना भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे हे एक नंबरचे विश्वासघातकी नेते असल्याचं म्हटलं आहे. तसंच उद्धव ठाकरेंमध्ये बाळासाहेबांचा एकही गुण नाही. ते जर यापुढे अशाच पद्धतीनं आमच्या नेत्यांना बोलणार असतील तर आम्ही सोडणार नाही, असा इशाराच बावनकुळे यांनी दिला आहे. 

Web Title: BJP's attack on Uddhav Thackeray, Keshav Upadhye Criticize Uddhav Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.