जिल्हा परिषदांच्या अध्यक्ष निवडीत भाजपाची बाजी

By admin | Published: March 21, 2017 08:55 PM2017-03-21T20:55:55+5:302017-03-21T20:57:20+5:30

राज्यातील 25 जिल्हा परिषदांच्या अध्यक्षांच्या निवडीत भाजपाने बाजी मारली आहे. या अध्यक्षपदांच्या निवडीत काही ठिकाणी काँग्रेस शिवसेनेसोबत, भाजपा राष्ट्रवादीसोबत गेली.

BJP's bet on choosing Zilla Parishad chairman | जिल्हा परिषदांच्या अध्यक्ष निवडीत भाजपाची बाजी

जिल्हा परिषदांच्या अध्यक्ष निवडीत भाजपाची बाजी

Next
style="text-align: justify;">ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 21 - राज्यातील 25 जिल्हा परिषदांच्या अध्यक्षांच्या निवडीत भाजपानेच बाजी मारली आहे. या अध्यक्षपदांच्या निवडीत काही ठिकाणी काँग्रेस शिवसेनेसोबत, भाजपा राष्ट्रवादीसोबत गेल्याचे दिसून आले.  
राज्यातील 25 पैकी दहा जिल्हा परिषदांवर भाजपाचे अध्यक्ष निवडून आले आहेत. तर राष्ट्रवादीचे 6, कॉंग्रेसचे 5 आणि 4 ठिकाणी शिवसेनेच्या अध्यक्षांची निवड झाली आहे. त्यामुळे गेल्या महानगरपालिकांच्या निवडणुकीत घवघवीत यश मिळाल्यानंतर भाजपाने परिषदांच्या अध्यक्षपदांवर सुद्धा आपले वर्चस्व असल्याचे सिद्ध केले आहे. विशेष म्हणजे, अध्यक्षपदांच्या निवडीत काही ठिकाणच्या जिल्हा परिषदांमध्ये सत्तेसाठी काँग्रेसने शिवसेनेसोबत आणि भाजपा राष्ट्रवादीसोबत हातमिळवणी केल्याचे दिसून आले. 
याचबरोबर बीड जिल्हा परिषद निवडणुकीतील पराभवाने व्यथित झालेल्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी अध्यक्षपदाच्या निवडणुकीत बाजी मारली. सर्वाधिक जागा मिळविणा-या राष्ट्रवादीला शह देत याठिकाणी भाजपाने सत्तेचे गणित जुळविले. जळगावमध्ये भाजपा आणि काँग्रेसने युती केली. अमरावतीमध्ये कॉंग्रेससोबत शिवसेनेने हातमिळवणी केली. बुलडाण्यात भाजपा आणि राष्ट्रवादी एकत्र आले. त्याचबरोबर नाशिकमध्ये भाजपला दूर ठेवण्यासाठी चक्क शिवसेना-काँग्रेस आणि माकप अशी आघाडी बघायला मिळाली. 
 
जिल्हा परिषदांवर निवडून आलेले अध्यक्ष आणि उपाध्यक्ष खालील प्रमाणे - 
 
जळगाव - अध्यक्ष - उज्ज्वला पाटील (भाजपा) उपाध्यक्ष - नंदकिशोर महाजन (भाजपा)
अहमदनगर - अध्यक्ष - शालिनी विखे पाटील (काँग्रेस) उपाध्यक्ष - राजश्री घुले (राष्ट्रवादी) 
नाशिक - अध्यक्ष - शीतल सांगळे (शिवसेना) उपाध्यक्ष - नयना गावीत (काँग्रेस)
औरंगाबाद - अध्यक्ष - देवयानी डोणगांवकर (शिवसेना) उपाध्यक्ष - केशवराव तायडे (काँग्रेस)
जालना - अध्यक्ष - अनिरुद्ध खोतकर (शिवसेना) उपाध्यक्ष - सतीश टोपे (राष्ट्रवादी) 
बीड -  अध्यक्ष - सविता गोल्हार (भाजपा) उपाध्यक्ष - जयश्री म्हस्के (शिवसंग्राम) 
नांदेड - अध्यक्ष - शांताबाई जवळगावकर (काँग्रेस) उपाध्यक्ष - समाधान जाधव (राष्ट्रवादी) 
हिंगोली - अध्यक्ष - शिवराणी नरवाडे (शिवसेना) उपाध्यक्ष - अनिल पतंगे (राष्ट्रवादी)
परभणी - अध्यक्ष - उज्ज्वला राठोड (राष्ट्रवादी) उपाध्यक्ष - भावना नखाते (राष्ट्रवादी) 
लातूर - अध्यक्ष - मिलिंद लातुरे (भाजपा) उपाध्यक्ष - रामचंद्र तिरुके (भाजपा) 
उस्मानाबाद - अध्यक्ष - नेताजी पाटील (राष्ट्रवादी) उपाध्यक्ष - अर्चनाताई पाटील (राष्ट्रवादी) 
रायगड -  अध्यक्ष - आदिती तटकरे (राष्ट्रवादी) उपाध्यक्ष - आस्वाद पाटील (शेकाप)
रत्नागिरी -  अध्यक्ष - स्नेहा सावंत (शिवसेना) उपाध्यक्ष - संतोष थेराडे (शिवसेना)
सिंधुदुर्ग - अध्यक्ष - रेश्मा सावंत (काँग्रेस) उपाध्यक्ष -रणजीत देसाई (काँग्रेस)
सांगली - अध्यक्ष - संग्रामसिंह देशमुख (भाजपा) उपाध्यक्ष - सुहास बाबर (शिवसेना) 
कोल्हापूर - अध्यक्ष - शौमिका अमल महाडिक (भाजपा) उपाध्यक्ष - सर्जेराव पाटील (शिवसेना)
सोलापूर -  अध्यक्ष - संजय शिंदे (भाजपा महाआघाडी) उपाध्यक्ष - शिवानंद पाटील (भाजपा महाआघाडी)
सातारा - अध्यक्ष - संजिवराजे नाईक - निंबाळकर (राष्ट्रवादी) उपाध्यक्ष - वसंतराव मानकुमरे (राष्ट्रवादी) 
पुणे - अध्यक्ष - विश्वास देवकाते (राष्ट्रवादी) उपाध्यक्ष -विवेक वळसे-पाटील (राष्ट्रवादी) 
गडचिरोली - अध्यक्ष - योगिता भांडेकर (भाजपा) उपाध्यक्ष - अजय कंकडालवार (आविस)
बुलडाणा - अध्यक्ष - उमा तायडे (भाजपा) उपाध्यक्ष - मंगला रायपुरे (भाजपा)
वर्धा - अध्यक्ष - नितीन मडावी (भाजपा) उपाध्यक्ष - कांचन नांदुरकर (राष्ट्रवादी)
यवतमाळ - अध्यक्ष - माधुरी अनिल आडे (काँग्रेस) उपाध्यक्ष - श्याम जयस्वाल (भाजपा)
चंद्रपूर - अध्यक्ष - देवराव फोंगळे (भाजपा) उपाध्यक्ष - कृष्णा सहारे (भाजपा) 
अमरावती - अध्यक्ष - नितीन गोंडाणे (काँग्रेस) उपाध्यक्ष - दत्ता धोमणे (शिवसेना)

Web Title: BJP's bet on choosing Zilla Parishad chairman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.