'बविआ'समोर भाजपचे आव्हान! जागा शिंदेंच्या पण उमेदवार भाजपचे
By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2024 04:54 PM2024-11-06T16:54:33+5:302024-11-06T16:55:07+5:30
२०१९ मध्ये बविआने बोईसर, नालासोपारा आणि वसई या तीन मतदारसंघांवर वर्चस्व मिळविले होते.
हितेन नाईक, पालघर
पालघर जिल्ह्यात सद्यःस्थितीत बहुजन विकास आघाडी हा सर्वात मोठा पक्ष असून, त्यांचे तीन आमदार आहेत. दुसरीकडे शरद पवार गट, माकप आणि शिंदेंची शिवसेना, असे अन्य तीन आमदार आहेत. पालघर लोकसभा भाजपने जिंकल्यानंतर त्यांनी आपले उमेदवार शिंदेंच्या शिवसेनेच्या तिकिटावर उभे केले आहेत. यंदा जिल्ह्यात महायुती, महाआघाडी आणि बविआ, अशी तिरंगी लढती रंगणार आहे.
२०१९ मध्ये बविआने बोईसर, नालासोपारा आणि वसई या तीन मतदारसंघांवर वर्चस्व मिळविले होते. बविआने बोईसर येथे छुप्या पद्धतीने एका अपक्षाला रसद पुरवून शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार विलास तरे यांचा पराभव करण्याची रणनीती यशस्वी केली होती.
त्यातच बविआचे चिन्हही गेल्याने हा स्थानिक पक्ष दुहेरी कात्रीत सापडला असून, बविआला जिंकण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे.
पालघर जिल्ह्यात निवडणुकीतील कळीचे मुद्दे
पालघर हा शिवसेनेचा बालेकिल्ला सेनेच्या दोन गटांत विभागला गेल्याने आव्हानात्मक ठरला असून, शिंदेसेना- उद्धवसेना वर्चस्वासाठी होणारी लढत रंगतदार ठरणार आहे.
शिंदेसेनेला आपला उमेदवार जिंकण्याची गॅरंटी नसल्याने त्यांना भाजपमधून माजी खासदार राजेंद्र गावित यांना आयात करावे लागले आहे. त्यामुळे याच मतदारसंघातून निवडून आलेले, पण भाजपमध्ये गेलेल्या माजी आमदार अमित घोडा यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज सादर केला आहे.
निकोले यांच्याविरोधात आपल्याच पक्षातील काही पदाधिकाऱ्यांची नाराजी असल्याची चर्चा आहे. तिथे विनोद मेढा यांना भाजपने त्यांच्याविरोधात उतरविले आहे.