काटोलमध्ये भाजपचा दबदबा
By admin | Published: August 29, 2016 04:16 PM2016-08-29T16:16:14+5:302016-08-29T16:16:14+5:30
काटोल नगर परिषदेच्या रिक्त असलेल्या ९ जागांपैकी ७ जागांवर भाजपचे उमेदवार विजयी झाले तर उर्वरित दोन जागांवर शेकापला समाधान मानावे लागले. शेकापच्या
Next
>ऑनलाइन लोकमत
काटोल (नागपूर), दि. 29 - काटोल नगर परिषदेच्या रिक्त असलेल्या ९ जागांपैकी ७ जागांवर भाजपचे उमेदवार विजयी झाले तर उर्वरित दोन जागांवर शेकापला समाधान मानावे लागले. शेकापच्या नगरसेवकांना अपात्र ठरविल्याने ही पोटनिवडणूक घेण्यात आली. परंतु त्या जागा पुन्हा ताब्यात घेण्यात शेकापला अपयश आले. प्रभाग १-ब मधून सुभाष कोठे, प्रभाग १-ड मधून अंजली डेहणकर, प्रभाग २-अ मधून श्वेता डोंगरे, प्रभाग २-ड मधून सुषमा हिरुडकर, प्रभाग ३-ड मधून केतन देशमुख, प्रभाग ४-क मधून रत्ना रेवतकर, प्रभाग ४-ड मधून राजू चरडे हे भाजपचे उमेदवार विजयी झाले. प्रभाग क्र. ३-ब मधून कविता काळे, ३-क मधून अश्विनी भगत या शेकापच्या दोन उमेदवारांना विजय मिळाला.
काटोल नगर परिषदेत आधी राहुल देशमुख यांच्या नेतृत्वातील शेतकरी कामगार पक्षाची सत्ता होती. तत्कालीन नगराध्यक्ष राहुल देशमुख यांच्यासह ९ नगरसेवकांना अपात्र केल्यानंतर नगराध्यक्षपदी भाजप लक्ष्मी जोशी विराजमान झाल्या. त्यानंतर आता पोटनिवडणुकीत शेकापला धक्का बसला. या पोटनिवडणुकीनंतर शेकापकडे ३, माजी मंत्री अनिल देशमुख यांच्या नेतृत्वातील राष्टÑवादी काँग्रेसचा १ तर विद्यमान आमदार आशिष देशमुख यांच्या भाजपच्या गटाकडे १७ नगरसेवक आहेत. येत्या तीन महिन्यांत पुन्हा नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणूक होणार आहे.