सहा सरकारी बँकाच्या खासगीकरणावर भाजपाचा डोळा, राष्ट्रवादीच्या नेत्याचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2020 03:14 PM2020-09-06T15:14:11+5:302020-09-06T15:19:16+5:30

"नोटबंदीचा चुकलेला निर्णय आणि जीएसटीची नियोजन शून्य अंमलबजावणीमुळे आपली अर्थव्यवस्था उद्ध्वस्त झाली"

BJP's eye on privatization of six banks, NCP leader's allegation | सहा सरकारी बँकाच्या खासगीकरणावर भाजपाचा डोळा, राष्ट्रवादीच्या नेत्याचा आरोप

सहा सरकारी बँकाच्या खासगीकरणावर भाजपाचा डोळा, राष्ट्रवादीच्या नेत्याचा आरोप

googlenewsNext
ठळक मुद्देया बँकांचे खासगीकरण करू नका, या बँका विकू नका, असे आवाहनही राष्ट्रवादी काँग्रेसने केले आहे.

मुंबई : पीएसयू बँकांचेभाजपा सरकारने याआधीच विलिनीकरण करून ही संख्या दहावर आणली आहे. आता भाजपाचा डोळा ६ प्रमुख पीएसयू बँकाच्या निर्गुंतवणुकीकरणावर आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसने केला आहे. तसेच, या बँकांचे खासगीकरण करू नका, या बँका विकू नका, असे आवाहनही राष्ट्रवादी काँग्रेसने केले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे यांनी भाजपा सरकारवर हा आरोप केला आहे. ५ ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था देण्याचे आश्वासन आणि स्वप्न दाखविणारी भाजपा सरकार आता देशाची संपत्तीचा लिलाव करीत आहे. ही राष्ट्र संपत्ती अनेक वर्षांच्या मेहनतीमुळे निर्माण झाली आहे आणि अजूनही बहुसंख्य ठेवीदारांचा सरकारी बँकांवर विश्वास आहे, असे महेश तपासे यांनी म्हटले आहे.

याचबरोबर, नोटबंदीचा चुकलेला निर्णय आणि जीएसटीची नियोजन शून्य अंमलबजावणीमुळे आपली अर्थव्यवस्था उद्ध्वस्त झाली आणि आता कोरोना साथीने त्याला पार खोलवर गाडून टाकले आहे. बिघडलेल्या अर्थव्यवस्थेचे परिणाम आता सर्वांनाच जाणवत आहे, असे महेश तपासे म्हणाले. 

याशिवाय, रोजगार निर्मिती आणि आर्थिक विकास यासारख्या मुख्य मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करण्याऐवजी भाजपा सरकारने भावनिक विषयांवर आपल्या भूमिका मांडल्या आहेत, असा आरोपही महेश तपासे यांनी केला आहे.

दरम्यान, रेल्वे स्थानके, विमानतळांपाठोपाठ आता बँकिंग क्षेत्रातही मोठ्या प्रमाणावर खासगीकरण करण्यासाठी केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. 

आणखी बातम्या...

राष्ट्रवादीला काँग्रेसमध्ये विलीन करा अन् शरद पवारांना अध्यक्ष बनवा; रामदास आठवलेंची सूचना    

- 'ना भूले हैं, ना भूलने देंगे'; सुशांतच्या मृत्यूवरून राजकारण, भाजपाने छापले स्टिकर्स    

- "२०२४ आणि २०२९ मध्येही भाजपा जिंकणार", सुब्रमण्यम स्वामींचा मोदी सरकारला सल्ला     

- "स्वत:चे ट्विटर हँडल स्वत: वापरावे, राजकीय पक्षांना देऊ नये", संजय राऊतांचा कंगना राणौतला टोला      

- BSNL कंपनी २० हजार कर्मचाऱ्यांची कपात करणार, खर्चात काटकसर करण्याचे आदेश

-'...अन्यथा कंगनाच्या सिनेमाचे सेट जाळून टाकू', करणी सेनेचा इशारा

- कंगनाने मुंबईला शहाणपण शिकवण्याची गरज नाही; भाजपाचा 'यू-टर्न'

मुंबईत येतेय, कोणाच्या बापात हिंमत असेल तर थांबवा; कंगनाचे खुले आव्हान

Web Title: BJP's eye on privatization of six banks, NCP leader's allegation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.