भाजपाची मुसंडी; काँग्रेसला हादरा

By admin | Published: October 20, 2014 05:08 AM2014-10-20T05:08:47+5:302014-10-20T05:08:47+5:30

काँग्रेसला मागे सारत भाजपाने मराठवाड्यात मारलेल्या मुसंडीचा जोर एवढा जबरदस्त आहे की, आजवर काँग्रेस आणि शिवसेना यांचे प्रभावक्षेत्र असलेल्या मराठवाड्यात काँग्रेसला जबर पराभवाला सामोरे जावे लागले

BJP's fascination; Congress quits | भाजपाची मुसंडी; काँग्रेसला हादरा

भाजपाची मुसंडी; काँग्रेसला हादरा

Next

सुधीर महाजन
काँग्रेसला मागे सारत भाजपाने मराठवाड्यात मारलेल्या मुसंडीचा जोर एवढा जबरदस्त आहे की, आजवर काँग्रेस आणि शिवसेना यांचे प्रभावक्षेत्र असलेल्या मराठवाड्यात काँग्रेसला जबर पराभवाला सामोरे जावे लागले, तर सेनेचा प्रभाव कमी करीत त्यांना रोखून ठेवले. या निवडणुकीचे विशेष म्हणजे औरंगाबाद आणि नांदेड या दोन प्रमुख शहरांमध्ये मजलिस-ए-इत्तेहादुल मुसलमिन (एमआयएम) या पक्षाचा होत असलेला मराठवाड्यातील उदय.
या पक्षाने औरंगाबादेत एक जागा जिंकली आणि नांदेडमध्येही जोरदार टक्कर दिली. ही घटना म्हणजे औरंगाबाद शहराच्या राजकारणाचा पोत बदलण्याची चिन्हे आहेत. याचे परिणाम चार महिन्यांनी होणाऱ्या महापालिका निवडणुकीत ठळकपणे जाणवतील. औरंगाबाद पूर्व आणि मध्य या दोन मतदारसंघांमध्ये मुस्लिमांच्या मतांचे ध्रुवीकरण स्पष्टपणे दिसून आले. ही गंभीर बाब आहे. काँग्रेसने लातूर, तर राष्ट्रवादीने उस्मानाबादमधील आपला प्रभाव कायम ठेवला. बीडमधील राष्ट्रवादीचा प्रभाव संपुष्टात आला आहे, तर जालन्यात भाजपाचे कमळ फुलले. औरंगाबाद मध्यची शिवसेनेच्या दृष्टीने प्रतिष्ठेची असलेली जागा एमआयएमने खेचून घेतली. हिंगोली, परभणी या दोन जिल्ह्यांच्या प्रभावामध्ये बदल झाला आहे. नांदेडमध्ये नरेंद्र मोदींनी सभा घेऊनही लोहा-कंधारची जागा शिवसेनेचे प्रताप पाटील चिखलीकरांनी जिंकली. लातूर व उस्मानाबादमध्ये शिवसेनेची पीछेहाट झाली. मराठवाड्यात मोदींचा प्रभाव दिसून आला. त्यामुळे भाजपाला अपेक्षेपेक्षा जास्त जागा मिळाल्या.

Web Title: BJP's fascination; Congress quits

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.