भाजपाच्या फ्लेक्सबाजीचा निषेध

By Admin | Published: June 21, 2016 12:36 AM2016-06-21T00:36:31+5:302016-06-21T00:36:31+5:30

भारतीय जनता पक्षाच्या राज्य कार्यकारिणीची बैठक पुण्यात आयोजित करण्यात आल्याच्या निमित्ताने शहरभर बेकायदेशीरपणे फ्लेक्स उभारून शहराचे विद्रूपीकरण करण्यात

BJP's flagging ban | भाजपाच्या फ्लेक्सबाजीचा निषेध

भाजपाच्या फ्लेक्सबाजीचा निषेध

googlenewsNext

पुणे : भारतीय जनता पक्षाच्या राज्य कार्यकारिणीची बैठक पुण्यात आयोजित करण्यात आल्याच्या निमित्ताने शहरभर बेकायदेशीरपणे फ्लेक्स उभारून शहराचे विद्रूपीकरण करण्यात आल्याप्रकरणी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी मुख्य सभेत सोमवारी आंदोलन केले. पालिकेची परवानगी न घेता लाखो रुपयांचे उत्पन्न बुडविणाऱ्या भाजपा नेत्यांच्या कार्यालयासमोर बॅण्डबाजा वाजवून त्याची वसुली करण्याची मागणी या वेळी नगरसेवकांकडून करण्यात आली.
महापालिकेत मुख्य सभेला सुरुवात होताच राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसच्या नगरसेवकांनी ‘भाजपाचे नेते आले आणि शहर विद्रूप करून गेले’ असे लिहिलेले फलक फडकाविले. भाजपाकडून शहरात बेकायदेशीरपणे करण्यात आलेल्या फ्लेक्सबाजीच्या विरोधात या वेळी घोषणा देण्यात आल्या. उपमहापौर मुकारी अलगुडे, सभागृहनेते बंडू केमसे, विरोधी पक्षनेते अरविंद शिंदे, कमल व्यवहारे, दिलीप बराटे, अविनाश बागवे यांच्यासह अन्य नगरसेवक या आंदोलनात सहभागी झाले. या वेळी बोलताना रिपाइंचे गटनेते सिद्धार्थ धेंडे म्हणाले, ‘‘महापुरुषांच्या जयंतीनिमित्त एखादा फ्लेक्स शहरात लावायचा असेल तर प्रशासनाकडे विनंत्या कराव्या लागतात. दुसरीकडे भाजपाकडून सर्रास बेकायदेशीरपणे फ्लेक्स उभारले तरी त्यावर कारवाई होत नाही. भाजपाकडून सुरू असलेल्या व्यक्तिपूजेला पायबंद घातला पाहिजे.’’
अरविंद शिंदे म्हणाले, ‘‘पार्टी विथ डिफरन्स असे म्हणणाऱ्या भाजपाकडून बेकायदेशीर फ्लेक्सबाजी होणे योग्य नाही. त्यांनी फ्लेक्स लावावेत मात्र त्यासाठी परवानगी घ्यावी. गणेश मंडळावर बेकायदा फ्लेक्स लावल्याप्रकरणी गुन्हे दाखल केले आहेत. त्यानुसार भाजपाच्या कार्यकर्त्यांवरही याबाबत गुन्हे दाखल करण्यात यावेत.’’ सभागृह नेते बंडू केमसे म्हणाले, ‘‘भाजपाचे नेते नितीन गडकरी यांनी नुकताच ‘जेवढे पचेल तेवढेच खा’ असा कार्यकर्त्यांना सल्ला दिला आहे. मात्र भाजपाचे लोक नुसचे खा... खा करत आहेत.’’

Web Title: BJP's flagging ban

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.