भाजपाचा गेम, शिवसेना विरोधीपक्ष नेतेपद गमावणार ?
By admin | Published: November 5, 2014 10:23 AM2014-11-05T10:23:19+5:302014-11-05T10:23:19+5:30
१० नोव्हेंबरपूर्वी शिवसेनेने गटनेता जाहीर केला नाही तर शिवसेना विरोधीपक्ष नेतेपदही गमावण्याची दाट शक्यता आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ५ - भाजपाला पाठिंबा देण्याविषयी शिवसेनेने अद्याप ठोस भूमिका घेतलेली नसतानाच भाजपाने शिवसेनेची कोंडी करण्याचे प्रयत्न सुरु केल्याचे समजते. १० नोव्हेंबरपूर्वी शिवसेनेने गटनेता जाहीर केला नाही तर शिवसेना विरोधीपक्ष नेतेपदही गमावण्याची दाट शक्यता आहे.
भाजपा सरकारचा शपथविधी पार पडला असून आता १० ते १२ नोव्हेंबरदरम्यान होणा-या विधीमंडळाच्या अधिवेशनात भाजपाला विश्वासदर्शक ठरावाची परीक्षेत उत्तीर्ण होणे गरजेचे आहे. यासाठी भाजपाला शिवसेनेची साथ लागणार आहे. १० नोव्हेंबरला अधिवेशन सुरु होण्यापूर्वी शिवसेनेला विधीमंडळातील गटनेता निवडणे गरजेचे आहे. शिवसेनेने याविषयी निर्णय घेतला नाही व भाजपाला पाठिंबाही दिला नाही तर काँग्रेसकडे विरोधीपक्ष नेतेपद जाईल. त्यामुळे मंगळवारी भाजपाला अल्टिमेटम देणा-या शिवसेनेला आता भाजपाने अप्रत्यक्षरित्या अल्टिमेटम देऊन शिवसेना नेतृत्वाची कोंडी केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.