भाजपचे उद्यापासून 'गाव चलो' अभियान, गडकरी, फडणवीस, दानवे, गोयल करणार गावात मुक्काम

By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2024 10:02 AM2024-02-03T10:02:25+5:302024-02-03T10:02:42+5:30

BJP News: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पीयूष गोयल, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रावसाहेब दानवे, डॉ. भागवत कराड, डॉ. भारती पवार, कपिल पाटील, चंद्रशेखर बावनकुळे, राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे, भाजपचे आमदार- खासदार नेते एकेका गावात मुक्काम करतील, तेथील लोकांशी संवाद साधतील.

BJP's 'Gaon Chalo' campaign from tomorrow, Gadkari, Fadnavis, Danve, Goyal will stay in the village | भाजपचे उद्यापासून 'गाव चलो' अभियान, गडकरी, फडणवीस, दानवे, गोयल करणार गावात मुक्काम

भाजपचे उद्यापासून 'गाव चलो' अभियान, गडकरी, फडणवीस, दानवे, गोयल करणार गावात मुक्काम

मुंबई  - केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पीयूष गोयल, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रावसाहेब दानवे, डॉ. भागवत कराड, डॉ. भारती पवार, कपिल पाटील, चंद्रशेखर बावनकुळे, राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे, भाजपचे आमदार- खासदार नेते एकेका गावात मुक्काम करतील, तेथील लोकांशी संवाद साधतील. भाजपच्या गाव चालू अभियानाला ४ फेब्रुवारीपासून सुरुवात होत आहे. ते ११ फेब्रुवारीपर्यंत चालेल.

प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी शुक्रवारी येथे पत्रपरिषदेत या अभियानाबाबत माहिती दिली. फडणवीस हे नागपूर जिल्ह्यातील पारडसिंगा येथे, गडकरी नागपूर जिल्ह्यातील धापेवाडा (ता. कळमेश्वर) मुंबई अध्यक्ष आ. आशिष शेलार गुरामवाडी (ता. मालवण), रेल्वे रावसाहेब दानवे हे जालना जिल्ह्यातील वालसावंगी येथे, विनोद तावडे हे विलेपार्ले येथे, बावनकुळे हे अमरावती जिल्ह्यातील साऊर येथे एक रात्र मुक्कामी असतील. शहरी भागात वॉर्डनिहाय हे अभियान राबविले जाईल.

Web Title: BJP's 'Gaon Chalo' campaign from tomorrow, Gadkari, Fadnavis, Danve, Goyal will stay in the village

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.