भाजपाचे गटनेते श्रीनाथ भिमाले

By admin | Published: March 7, 2017 01:05 AM2017-03-07T01:05:54+5:302017-03-07T01:05:54+5:30

महापालिकेतील भाजपाच्या गटनेतेपदी श्रीनाथ भिमाले यांची निवड करण्यात आली असल्याची घोषणा शहराध्यक्ष योगेश गोगावले यांनी सोमवारी केली.

BJP's group leader Srinath Bhimale | भाजपाचे गटनेते श्रीनाथ भिमाले

भाजपाचे गटनेते श्रीनाथ भिमाले

Next


पुणे : महापालिकेतील भाजपाच्या गटनेतेपदी श्रीनाथ भिमाले यांची निवड करण्यात आली असल्याची घोषणा शहराध्यक्ष योगेश गोगावले यांनी सोमवारी केली. महापालिकेतील सत्ताधारी पक्ष बनलेल्या भाजपाचा गटनेता म्हणून भिमाले हे सभागृह नेत्याची भूमिका पार पाडतील. भाजपाच्या ९३ सदस्यांची मंगळवारी विभागीय आयुक्त एस. चोक्कलिंगम यांच्याकडे नोंदणी करण्यात येणार आहे.
भाजपाच्या नवनिर्वाचित सदस्यांची बैठक रविवारी पक्षाचे निरीक्षक व सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. या वेळी त्यांनी पक्षाचे गटनेते व महपौरपदी कोणाची निवड करावी, याबाबत नगरसेवकांच्या भावना जाणून घेतल्या होत्या. त्यानुसार भिमाले यांची गटनेतेपदी निवड करण्यात आली आहे.
सभागृहात पक्षाच्या नगरसेवकांची १०० टक्के उपस्थिती राहील तसेच सभागृहाचे गांभीर्य कायम राहावे यासाठी प्रयत्न करेन, असे भिमाले यांनी सांगितले. सभागृहाच्या माध्यमातून शहराचे प्रलंबित प्रश्न सोडविण्याचा
प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी या वेळी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)
भिमाले यांचे शिक्षण बी.कॉम.पर्यंत झालेले आहे. त्यांची १९९८मध्ये भारतीय जनता युवा मोर्चाच्या कोशाध्यक्षपदी निवड करण्यात आली. ते २००२मध्ये पहिल्यादां डीएडी कॉलनीतून महापालिकेवर नगरसेवक म्हणून निवडून आले.
२००७मध्ये त्यांच्या पत्नी वंदना भिमाले या नगरसेविका म्हणून निवडून आल्या होत्या. त्यानंतर २०१२ मध्ये भिमाले पुन्हा नगरसेवक म्हणून निवडून आले. २०१२मध्ये त्यांना स्थायी समिती सदस्य म्हणून काम करण्याची संधी मिळाली. २०१३मध्ये प्रदेश कार्यकारणी सदस्य म्हणून त्यांनी काम पाहिले.
नुकत्याच झालेल्या २०१७च्या निवडणुकीत त्यांनी तिसऱ्यांना विजय मिळविला आहे. ज्येष्ठतेनुसार त्यांना पक्षाच्या गटनेतेपदी निवडण्यात आले आहे.

Web Title: BJP's group leader Srinath Bhimale

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.