भाजपाची उच्च न्यायालयापुढे माघार!

By admin | Published: March 2, 2016 03:23 AM2016-03-02T03:23:01+5:302016-03-02T03:23:01+5:30

उच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर कोंडीत सापडलेल्या भाजपाने नरिमन पॉइंट येथील नेहरू गार्डनमधील कार्यालयाचे बेकायदेशीर बांधकाम कमी करण्याची तयारी दर्शवली आहे.

BJP's High Court withdraws! | भाजपाची उच्च न्यायालयापुढे माघार!

भाजपाची उच्च न्यायालयापुढे माघार!

Next

मुंबई : उच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर कोंडीत सापडलेल्या भाजपाने नरिमन पॉइंट येथील नेहरू गार्डनमधील कार्यालयाचे बेकायदेशीर बांधकाम कमी करण्याची तयारी दर्शवली आहे. यापूर्वी बांधकाम अधिकृत असल्याचा दावा करणाऱ्या भाजपाने आपल्या भूमिकेपासून माघार घेतली आहे.
नेहरू गार्डनमध्ये भाजपाचे कार्यालय उभारण्यात आले आहे. मात्र गार्डनच्या जागेवर अतिक्रमण करून सरकारने मंजूर केलेल्या भूखंडापेक्षा अधिक भूखंडावर बांधकाम केले. सरकारने १,२०० चौरस फूट जागा दिली होती. मात्र ते वाढवून भाजपाने सुमारे ४,००० चौरस फूट क्षेत्रफळावर कार्यालय उभारले. याविरोधात नरिमन पॉइंट रेसिडेंट असोसिएशनने उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. मंगळवारी सुनावणीवेळी भाजपातर्फे एस.यू. कामदार यांनी १,२०० चौ. फुटांच्या पुढील बांधकाम तोडण्यास तयार असल्याची माहिती दिली. त्यावर खंडपीठाने याबाबत
२ मार्च रोजी आदेश देऊ, असे
स्पष्ट केले. गेल्या सुनावणीवेळी खंडपीठाने कायद्यानुसार नसलेले सर्व बांधकाम तोडलेच पाहिजे, असे म्हटले होते. (प्रतिनिधी)

Web Title: BJP's High Court withdraws!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.