भाजपचा इनकमिंग कोटा फुल्ल, आता इतर पक्षातील नेते नको - गिरीश महाजन 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2023 08:04 AM2023-07-10T08:04:38+5:302023-07-10T08:05:03+5:30

काँग्रेसमधूनही काही नेते भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चेबाबत विचारले असता त्यांनी हे उत्तर दिले.

BJP's incoming quota is full, no more leaders from other parties - Girish Mahajan | भाजपचा इनकमिंग कोटा फुल्ल, आता इतर पक्षातील नेते नको - गिरीश महाजन 

भाजपचा इनकमिंग कोटा फुल्ल, आता इतर पक्षातील नेते नको - गिरीश महाजन 

googlenewsNext

जामनेर (जि. जळगाव)  : भाजपचा इनकमिंग कोटा आता संपला आहे.  त्यामुळे इतर पक्षांतील लोकांना भाजपमध्ये घेण्याबाबत विचार नाही, असे राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी म्हटले आहे. एकलव्य शाळेच्या पटांगणावर रविवारी रोजगार मेळावा झाला. यानंतर   पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली.  

काँग्रेसमधूनही काही नेते भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चेबाबत विचारले असता त्यांनी सांगितले की, अजित पवार उपमुख्यमंत्री होते. ते भाजपसोबत आल्याने त्यांना उपमुख्यमंत्री करता आले. काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री येणार असल्याचे तुम्ही सांगता; मात्र त्यांना घेऊन दोन मुख्यमंत्री कसे करणार?  असा मिश्कील सवाल त्यांनी केला.  

विधान परिषदेच्या सभापतिपदी भाजपचे राम शिंदे यांच्या नावाची चर्चा सुरू असताना बदललेल्या राजकीय परिस्थितीनंतर माजी सभापती रामराजे निंबाळकर यांचे नाव समोर आले आहे,  याबाबत ते म्हणाले की,  आता आमचे सरकार तीन इंजिनचे असल्याने सर्वांनुमते निर्णय घेऊ. सध्या खुर्च्यांची पळवापळवी सुरू असल्याने खुर्ची सांभाळा, असेही ते म्हणाले.  

Web Title: BJP's incoming quota is full, no more leaders from other parties - Girish Mahajan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.