सत्तेसाठी इतकं पण दुटप्पी होऊ नये; भाजपानं ठाकरे गटाला पुन्हा डिवचलं
By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2023 11:42 AM2023-10-08T11:42:11+5:302023-10-08T11:42:48+5:30
सामनाच्या रोखठोक सदरातून संजय राऊतांनी परदेशातून आणल्या जाणाऱ्या वाघनखांवरून भाजपावर टीका केली.
मुंबई - सामना संपादक महोदय, याआधी जेव्हा तुम्ही, तुमचे नेते भाषणात मोठ्या जोराने कोथळा काढण्याची भाषा करत होतात, तेव्हा वाघनखं होते, आणि आता ती नाहीत? भगवान राम असो की छत्रपती शिवाजी महाराज याबाबत हल्ली उध्दव ठाकरे गटाचा एवढा आक्षेप का? आज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वाघनखाबद्दल शंका व्यक्त केली जाते आहे असं सांगत भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी उद्धव ठाकरे गटाला डिवचलं आहे.
केशव उपाध्ये म्हणाले की, मागे राम मंदीरासाठी गोळा करण्यात आलेल्या वर्गणीला खंडणी म्हणण्याची मजल गेली होती. श्री राम काल्पनिक आहे असं न्यायालयात म्हणणाऱ्या काँग्रेसचं कौतुक उध्दव ठाकरे गटाला आहे.. हिंदुत्वाला नाव ठेवणाऱ्या शेरजीलवर कारवाई हेच उध्दव ठाकरे मुख्यमंत्री असताना टाळली गेली होती. एकीकडे स्वतःला हिंदुत्ववादी म्हणायचं आणि दुसरीकडे नित्यनेमाने हिंदूंच्या भावना दुखवायच्या..सत्तेसाठी इतकं पण दुटप्पी होऊ नये असा टोला त्यांनी ठाकरेंना लगावला.
सामना संपादक महोदय, याआधी जेव्हा तुम्ही, तुमचे नेते भाषणात मोठ्या जोराने कोथळा काढण्याची भाषा करत होतात, तेव्हा वाघनखं होते, आणि आता ती नाहीत ?
— Keshav Upadhye (@keshavupadhye) October 8, 2023
भगवान राम असो की छत्रपती शिवाजी महाराज याबाबत हल्ली उध्दव ठाकरे गटाचा एवढा आक्षेप का?
आज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वाघनखाबद्दल…
संजय राऊत काय म्हणाले?
सामनाच्या रोखठोक सदरातून संजय राऊतांनी परदेशातून आणल्या जाणाऱ्या वाघनखांवरून भाजपावर टीका केली. राऊत म्हणाले की, अफझल खानाच्या वधावेळी महाराजांनी ही वाघनखे वापरली असा दावा भाजपाचे अंधभक्त इतिहासकार करतायेत, पण खऱ्या इतिहासकारांनी वाघनखांबाबतचा दावा फेटाळून लावला आहे. हा निवडणूक स्टंट आहे. मुळात ही वाघनखे शिवकालीन आहेत की खरोखरच अफझल खानाचा कोथळा काढण्यासाठी महाराजांनी वापरली ती हीच वाघनखे? यावर इतिहासकारांचे एकमत नाही. छत्रपतींनी अफझल खानाचा वध करताना खरेच वाघनखे वापरली का? यावर वाद आहेत असंही राऊतांनी म्हटलं आहे.