भाजपाचे ‘मिशन १00 प्लस’

By admin | Published: June 13, 2016 04:42 AM2016-06-13T04:42:57+5:302016-06-13T04:42:57+5:30

शिवसेनेसोबत युती न करता स्वबळावर लढवून मिशन १00 प्लसचे लक्ष्य निर्धारित करण्यात आले

BJP's 'Mission 100 Plus' | भाजपाचे ‘मिशन १00 प्लस’

भाजपाचे ‘मिशन १00 प्लस’

Next


नागपूर : पुढील वर्षाच्या सुरुवातीलाच होत असलेल्या महापालिका निवडणुकीचे शहर भाजपने बिगुल फुंकले आहे. ही निवडणूक शिवसेनेसोबत युती न करता स्वबळावर लढवून मिशन १00 प्लसचे लक्ष्य निर्धारित करण्यात आले आहे. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पक्षातर्फे निवडणुकीची जबाबदारी सांभाळणार आहेत. त्यामुळे राज्यात सरकारमध्ये सहभागी असलेल्या शिवसेनेला सोबत न घेता विधानसभा निवडणुकीप्रमाणे महापालिका निवडणूक स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु औपचारिकता म्हणून याबाबतचा अंतिम निर्णय प्रदेश भाजप नेत्यांवर सोपविण्यात आला आहे.
महापालिका निवडणुकीच्या पाशर््वभूमीवर शनिवारी रविभवन येथे भाजपची बैठक आयोजित करण्यात आली होती.
शहर अध्यक्ष सुधाकर कोहळे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक घेण्यात आली. यावेळी महापौर प्रवीण दटके, खासदार अजय संचेती, आमदार कृष्णा खोपडे, सुधाकर देशमुख, प्रा. अनिल सोले, विकास कुंभारे, गिरीश व्यास, सत्तापक्षनेता दयाशंकर तिवारी यांच्यासह पक्षाचे महामंत्री, विभाग अध्यक्ष व मंडळ अध्यक्ष सहभागी झाले होते. चार तास ही बैठक चालली.
महापालिका निवडणुकीवर चर्चा करण्यात आली. केंद्र व राज्य सरकारसोबतच महापालिकेतील भाजपच्या सत्ता काळात शहरात राबविण्यात आलेल्या विविध विकास कामांचा प्रचार करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. शहरात १८५७ बूथ आहेत. बूथ स्तरावरील कार्यकत्यांशी संपर्क साधून वरिष्ठांसोबत बैठक होणार आहे. (प्रतिनिधी)

Web Title: BJP's 'Mission 100 Plus'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.