सेनेचा भाजपाला गांधीगिरीने टोला

By admin | Published: October 6, 2014 05:23 AM2014-10-06T05:23:34+5:302014-10-06T05:23:34+5:30

दोनच दिवसांपूर्वी मोठा गवगवा करीत सुरू करण्यात आलेल्या ‘स्वच्छ भारत’ अभियानाबाबत भाजपाला खरोखर किती गांभीर्य आहे,

The BJP's mobilization of the army has taken Gandhiji | सेनेचा भाजपाला गांधीगिरीने टोला

सेनेचा भाजपाला गांधीगिरीने टोला

Next

जमीर काझी, मुंबई
दोनच दिवसांपूर्वी मोठा गवगवा करीत सुरू करण्यात आलेल्या ‘स्वच्छ भारत’ अभियानाबाबत भाजपाला खरोखर किती गांभीर्य आहे, याचा प्रत्यय शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबईत झालेल्या सभेनंतर पाहावयास मिळाला. रेसकोर्स मैदानावर सभेनंतर हजारो पाण्याच्या बाटल्या, कापडी झेंडे, मफलरी, पत्रके, कमळाचे बिल्ले पडून होते. भाजपाच्या नेत्यांना या अस्वच्छतेबाबत कसलीही फिकीर नव्हती की त्याबाबत कार्यकर्त्यांना कसलीही सूचनाही करण्यात आली नव्हती. पंतप्रधानांसह त्यांच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना आपला परिसर स्वच्छ ठेवण्याबाबतच्या शपथेचे इतक्यात विस्मरण झाले का, अशी विचारणा ‘मॉर्निंग वॉक’ला येणाऱ्या नागरिकांकडून व्यक्त करण्यात आली.
मैदानावर रात्रभर पडून राहिलेला कचरा शिवसैनिकांनी रविवारी सकाळी ‘गांधीगिरी’ करीत स्वच्छ केला आणि भाजपाच्या उक्ती आणि कृतीमध्ये जमीन-आस्मानाचा फरक असल्याचे दाखवून दिले. मलबार हिल मतदारसंघातील सेनेचे उमेदवार अरविंद दूधवडकर व त्यांच्या कार्यकर्त्यांनी मैदानावर सुमारे अर्धा तास स्वच्छता मोहीम राबवित जागोजागी पडलेला कचरा एकत्र केला आणि सर्व ढीग कचराकुंडीत टाकला.
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीच्या मुहूर्तावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘स्वच्छ भारत अभियान’ उपक्रमाचा प्रारंभ केला. मोदी यांनी स्वत: झाडू हातात घेत इंडिया गेट ंयेथील कचरा साफ केला होता, विविध वृत्तवाहिन्या व वृत्तपत्रांनी या अभियानाला मोठी प्रसिद्धी दिली होती. ‘मी कचरा करणार नाही, करू देणार नाही,’ अशी शपथ देशभरात शासकीय, निमशासकीय कार्यालये, शाळा व महाविद्यालयांमध्ये घेण्यात आली होती. मात्र शनिवारी रेसकोर्सवर मोदींच्या सभेला जमलेल्या हजारो श्रोत्यांना त्याचा विसर पडला होता. सभेच्या ठिकाणी कार्यकर्त्यांना वाटलेल्या पाण्याच्या बाटल्या, पक्षाचे झेंडे, चिन्ह असलेल्या टोप्या, मफलरी, पत्रके आणि कमळाची प्लॅस्टिकची चिन्हे त्याच ठिकाणी टाकून दिली होती. ते सर्व एकत्र ठेवण्याबाबत एकाही भाजपाच्या नेत्याने सूचना केली नव्हती. आज सकाळी ७च्या सुमारास शिवसेनेचे खा. अरविंद सावंत, उमेदवार अरविंद दूधवडकर, कार्यकर्त्यांसमवेत ‘मार्निंग वॉक’ला येणाऱ्या परिसरातील नागरिकांना भेटण्यासाठी मैदानावर गेले होते. त्यांना भेटणारे नागरिक मैदानावर इतस्तता पडलेल्या कचऱ्याबाबत नाराजी व्यक्त करीत होते. त्यामुळे दूधवडकर यांनी तातडीने झाडू मागवून घेत सर्व कचरा साफ करण्याचा निर्णय घेतला. अर्धा तासाच्या स्वच्छता मोहिमेनंतर पालिकेच्या कचराकुंडीत टाकण्यात आला. या वेळी काँग्रेसचे मदन बाफनाही उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: The BJP's mobilization of the army has taken Gandhiji

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.