अमित शहांचंही ठरलंय, डिसेंबर महिन्यात भाजपाला मिळणार नवीन अध्यक्ष
By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2019 03:17 PM2019-10-15T15:17:01+5:302019-10-15T15:25:32+5:30
अमित शहा यांच्याकडे सध्या भाजपाचे अध्यक्षपद आणि देशाचे गृहमंत्रीपद आहे. त्यामुळे पक्षाच्या स्वतंत्र कामकाजासाठी अमित शहा
मुंबई - भाजपा अध्यक्षपदी डिसेंबर महिन्यात नवीन चेहरा समोर येणार आहे. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि गृहमंत्री अमित शहा यांनी याबाबतची माहिती दिली आहे. इंडिया टुडे वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलताना, डिसेंबर महिन्यात पक्षाच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक होईल, असे अमित शहांनी सांगितलं.
अमित शहा यांच्याकडे सध्या भाजपाचे अध्यक्षपद आणि देशाचे गृहमंत्रीपद आहे. त्यामुळे पक्षाच्या स्वतंत्र कामकाजासाठी अमित शहा अध्यक्षपदापासून दूर होणार असून नवीन अध्यक्ष निवडणूक प्रक्रियेद्वारे निवडला जाईल. भाजपा पक्षाच्या संविधानानुसार ही निवडणूक प्रक्रिया पार पडेल, असे अमति शहांनी म्हटलंय. पक्षाला नवीन अध्यक्ष मिळाल्यानंतर पक्ष मला जी जबाबदारी देईल, ती मी पार पाडेल. आमच्या पक्षात काँग्रेसप्रमाणे पडद्यामागून अध्यक्षपद निवडले जात नाही, असा टोलाही अमित शहांनी मारला.
दरम्यान, भाजपाने जे.पी. नड्डा यांची भाजपाच्या कार्यकारी अध्यक्षपदी निवड केली आहे. भाजपाच्या संसदीय समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपा अध्यक्ष आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत जे. पी. नड्डांची निवड करण्यात आली होती. त्यावेळी केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह, नितीन गडकरी आणि थावरचंद गहलोत उपस्थित होते. जे. पी. नड्डा हे पंतप्रधान मोदी सरकारच्या पहिल्या पर्वात केंद्रीय आरोग्यमंत्री होते. सध्या अमित शहांच्या मार्गदर्शनाखाली नड्डा पक्षाचे काम पाहत आहेत.