लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाचा प्लॅन; महाराष्ट्रातील नेत्यांची दिल्लीत खलबतं

By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2022 02:52 PM2022-11-02T14:52:00+5:302022-11-02T14:52:53+5:30

केंद्रीय मंत्र्यांना लोकसभा मतदारसंघनिहाय प्रभारीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

BJP's Plan for Lok Sabha Elections; BJP State President Chandrasekhar Bawankule Target Mahavikas Aghadi | लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाचा प्लॅन; महाराष्ट्रातील नेत्यांची दिल्लीत खलबतं

लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाचा प्लॅन; महाराष्ट्रातील नेत्यांची दिल्लीत खलबतं

googlenewsNext

नवी दिल्ली - आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने भाजपानं तयारी सुरु केली आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आज दिल्लीत होते. त्यावेळी भाजपाचे केंद्रीय मंत्र्यांसोबत त्यांनी बैठक घेत संघटनात्मक कामाचा आढावा घेतला. लोकसभा प्रवास योजना या मोहिमेवर बैठकीत चर्चा करण्यात आली. या बैठकीला मंत्री रावसाहेब दानवे, कपिल पाटील, नारायण राणे, भारती पवार यांच्यासह इतर नेते उपस्थित होते. 

या बैठकीत केंद्रीय मंत्र्यांना लोकसभा मतदारसंघनिहाय प्रभारीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. या मंत्र्यांनी महिन्यातून १-२ दिवस त्या मतदारसंघासाठी द्यावा असं बैठकीत ठरलं आहे. राज्यातील विकास कामांसाठी राज्य सरकार काम करतेय. संघटना म्हणून मी माझी जबाबदारी पार पाडतोय. मुंबईतही आज रात्री राज्याचे सहसंघटन मंत्री, राष्ट्रीय प्रभारी यांच्या उपस्थितीत राज्यातील मंत्री, संघटनांचे पदाधिकारी यांच्यात समन्वय बैठक आयोजित करण्यात आली आहे. यात संघटना आणि सरकार यातून विकासाचं पाऊल पुढे टाकायचं आहे असं प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. 

त्याचसोबत महाराष्ट्रात २०२४ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, जे पी नड्डा यांच्या नेतृत्वात आम्ही राज्यात ४५ लोकसभा मतदारसंघात भाजपा आणि बाळासाहेबांची शिवसेना एकत्रित निवडणुका लढू आणि जिंकू असं निश्चित केले आहे. राज्यातील जनता महाविकास आघाडीला वैतागली आहे. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस एकत्रित राज्याचा कारभार विकासाच्या दृष्टीने पुढे घेऊन जात आहे असं बावनकुळेंनी म्हटलं. 

विरोधकांचा डाव हाणून पाडू
जे प्रकल्प राज्याबाहेर गेले. त्याबद्दल माहिती अधिकारात माहिती मागवली तर ते सर्व प्रकल्प मविआ सरकारच्या नाकर्तेपणामुळे आणि मुख्यमंत्री मंत्रालयात नसल्याने, राज्यात पोषक वातावरण निर्माण न झाल्याने हे प्रकल्प राज्याबाहेर गेले. खोटं बोला पण रेटून बोला, सरकार गेल्यामुळे अस्वस्थ आहेत. शेवटची घरघर राहिले ते थांबवण्यासाठी हा केविळवाणा प्रयत्न आहे. खोटं नरेटिव्ह सेट करून तिन्ही पक्ष वेगवेगळ्या तोंडाने बोलतात. सरकार काम करतेय त्याला अडथळा आणण्याचा प्रयत्न करतायेत. आम्ही भाजपा जिल्हाजिल्ह्यात महाविकास आघाडीचा खोटा अजेंडा हाणून पाडू असा इशारा भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला. 

मविआला उमेदवारही मिळणार नाहीत 
महाविकास आघाडीच्या नेत्यांना पुढच्या काळात अनेक प्रवेशाचे बॉम्बस्फोट होणार, तिन्ही पक्षातील नेते भाजपात येतील. विरोधकांना उमेदवार मिळणार नाही अशी परिस्थिती निर्माण होईल. मविआ कार्यकर्ते थांबवण्यासाठी हे सगळे एकत्रित नरेटिव्ह सेट करून ठेवतायेत. अडीच वर्ष जे पाप, बेईमानी केली त्यावरून जनता महाविकास आघाडीला रस्त्यावर आणण्याचं काम करणार आहे असा टोला भाजपानं लगावला. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: BJP's Plan for Lok Sabha Elections; BJP State President Chandrasekhar Bawankule Target Mahavikas Aghadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.