भाजपची निती घातक, RSS अन् शिवसेनेच्या विचारसरणीत समानता; उद्धव ठाकरेंनी स्पष्टच सांगितले

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2022 04:46 PM2022-03-20T16:46:24+5:302022-03-20T16:46:51+5:30

जसं समोर विरोधक आहे त्याच्या कुरापती ओळखा. स्वत: काही केले हे न सांगता आपल्यावर टीका करत आहेत असा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांना दिला.

BJP's policy is dangerous, similarity between RSS and Shiv Sena's ideology Says Uddhav Thackeray | भाजपची निती घातक, RSS अन् शिवसेनेच्या विचारसरणीत समानता; उद्धव ठाकरेंनी स्पष्टच सांगितले

भाजपची निती घातक, RSS अन् शिवसेनेच्या विचारसरणीत समानता; उद्धव ठाकरेंनी स्पष्टच सांगितले

Next

मुंबई  - आम्ही भाजपला(BJP) सोडलंय हिंदुत्व नाही. हे राजकारणासाठी हिंदुत्व करताहेत आपण हिंदुत्वासाठी राजकारणात हा मूळ फरक आहे. रा.स्व संघ यांची विधाने पाहा, मग काय मोहन भागवतांना खान वगैरे म्हणणार आहात? पहिले सावरकरांवर आम्हाला शिकवतात, भागवतांनी म्हटले सावरकर मुस्लीम विरोधी नव्हते उर्दूत गझल लिहिले आहे. रा. स्व संघाच्या विचारसरणीत आणि आपल्यात समानता आहे. परंतु आम्ही काही केले तर वाईट तुम्ही केले ते आदर्श. संघ मुक्त भारत नितीश बोलले. ते सत्तेसाठी यांना चालतात. भाजपची ही निती घातक आहे. त्याला काटशह गरजेचा असल्याचा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी(CM Uddhav Thackeray) लगावला आहे.

उद्धव ठाकरे म्हणाले की, भागवत म्हणतात संघ का विचार है हिंदुत्व, इस विचार पर चलते रहो. हिंदु धर्मशास्त्र ये मानवधर्मशास्त्र है इसलिए हमारा हिंदु राष्ट्र है. विविधता मे एकता को दुनिया हिंदुत्व कहती है, इसमे मुस्लमान नही चाहिए ऐसा आया तो वो हिंदुत्व नही यावर भाजपचे चमचे उत्तर देऊ शकतील का? हिंदुत्वाचे बाप आम्हीच आहोत असे सुद्धा उद्या हे म्हणतील. आपला तो बाबा इतरांचे गुंड असं त्यांनी सांगितले.

विरोधकांच्या कुरापती ओळखा

युती भाजपाने तोडली. त्यांनी बांधणी केली तशी आपल्याला करायची आहे. परंपरागत जे मतदारसंघ भाजपाकडे होते तिथे आपण का लढवत नाही? महिलांना समोर आणा. जिकणारे उमेदवार हवे, सदस्य, मतदार नोंदणी. आता पंचायत ते पार्लामेंट सर्व निवडणुका गांभीर्याने घ्यायच्या आहेत. जसं समोर विरोधक आहे त्याच्या कुरापती ओळखा. स्वत: काही केले हे न सांगता आपल्यावर टीका करत आहेत. शिवसंपर्क मोहीम नवीन नाही. त्या माध्यमातून शिवसेनेचे विचार घराघरांत पोहचवायचे आहे. एक सत्ता आल्यावर निखारे वरची जमलेली राखेवर फुंकर मारायची आहे शिवसैनिक हा  धगधहता निखारा. तोच शिवसंपर्क अभियानाचा उद्देश आहे असं उद्धव ठाकरेंनी सांगितले.

भाजपाची हिटलर नीती

हिटलर त्याचे प्रवक्ते चार फळ्या होत्या. पहिली फळी त्याची सकारात्मक बाजू जनतेसमोर मांडणे, दुसरी विरोधकांना उत्तर देणे, तिसरे आरोप करणे चौथी अफवा पसरवणे गोबेल्स निती हीच भाजपची भीती आहे. इतरांना सत्ता दिली तर खोटे भीतीचे चित्र उभे करायचे. MIM सोबत कदापी युती नाही ही भाजपा कडूनच आलेली ऑफर आहे.  औरंगजेबांच्या कबरीवर डोके टेकवणाऱ्या सोबत युती नाही. आपल्याला हिंदुत्व विरोधी ठरवतात. मध्येच काही कारण नसतांना एमआयएमने महाविकास आघाडीत येण्याचं विधान केले. आम्ही आणि MIM बरोबर जाणे कदापि शक्य नाही. अशी परखडपणे मते जनते समक्ष पोहचवावी लागतील असं आवाहन उद्धव ठाकरेंनी शिवसेना खासदारांना केले.

Web Title: BJP's policy is dangerous, similarity between RSS and Shiv Sena's ideology Says Uddhav Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.