सिद्धेश्वर सहकारी साखर कारखाना भाजपाच्या ताब्यात
By Admin | Published: May 22, 2017 07:50 PM2017-05-22T19:50:26+5:302017-05-22T19:50:26+5:30
सिद्धेश्वर सहकारी साखर कारखाना निवडणूक निकाल सोमवारी जाहीर झाला. यात भाजपाने 21 जागांपैकी 19 जागा जिंकून कारखाना ताब्यात घेतला.
>ऑनलाइन लोकमत
औरंगाबाद, दि. 22 - सिद्धेश्वर सहकारी साखर कारखाना निवडणूक निकाल सोमवारी जाहीर झाला. यात भाजपाने 21 जागांपैकी 19 जागा जिंकून कारखाना ताब्यात घेतला. तर कॉंग्रेसला केवळ 2 जागेवर समाधान मानावे लागले. यात शिवसेनेने तीन उमेदवार उभे केले होते. त्या तीनही उमेदवारांची डिपॉजिट जप्त झाली.
सिल्लोड येथील सिद्धेश्वर सहकारी साखर कारखाना निवडणूक साठी सिल्लोड, भोकरदन,फुलब्री या तीन तालुक्यातील 38 मतदान केन्द्रावर 11 हजार 667 मतदारां पैकी 4 हजार 192 मतदारानी आपले मतदानाचे हक्क बजावले.
यात 21 जागेपैकी भाजपा चे 6 उमेदवार आधीच बिनविरोध झाले होते. यामुळे 15 जागेसाठी मतदान झाले. त्यात भाजपने 13 जागा पटकावल्या व बिनविरोध 6 संचालक असे एकूण 19 संचालक निवडून आले.तर 2 जागा कॉंग्रेस ने पटकावल्या.
वैध मते व अवैध मते......
ऐकून झालेले मतदान:- 4 हजार 192
शिवना गट:-वैध मते 4030 अवैध मते 162,
घाटनांद्रा:-वैध मते 3952, अवैध मते 240,
निधोना:-वैध मते 4017, अवैध मते 175,
सोसायटी मतदारसंघ:-वैध मते 44, अवैध मते 00,
अनुसूचित जाती जमाती:-वैध मते 3960, अवैध मते 276, महिला राखीव:-वैध मते 4057, अवैध मते 179,इतर मागासवर्गीय:-वैध मते 3952, अवैध मते 284,भटक्या जाती जमाती:-वैध मते 4069, अवैध मते 167अशी आहे.
सिल्लोड येथील आयटीआय हॉल मध्ये सोमवारी सकाळी 8 वाजता मतमोजनिस सुरुवात झाली.यासाठी 12 टेबल वर 75 कर्मचारी तैनात करण्यात आले होते. 3 फ़ेऱ्या मध्ये दुपारी 2 वाजेपर्यंत चित्र स्पष्ठ होऊन निवडणूक निर्वाचन अधिकारी रशीद शेख, सहायक निर्वाचन अधिकारी मातेरे यांनी दुपारी 3 वाजता निकाल घोषित केला.
विजयी उमेदवार,पक्ष व त्यांना मिळालेली मते पुढीलप्रमाणे..........
विजयी उमेदवार:- व्यक्ति उसउत्पादक सभासद गट क्र 1 शिवना:- आबासाहेब जंजाळ(भाजप 3653), चंद्रशेखर साळवे(भाजप 3669), रामदास हिवाळे(भाजप 3388),
घाटनांद्रा गटातून:- लक्ष्मण तायडे (कॉंग्रेस 3589) काकासाहेब फरकाडे(भाजप 3540), शंकर माने(भाजप 3377),
सिल्लोड गटातून:- इद्रीस मुलतानी(भाजप बिनविरोध), सुनील प्रशाद(भाजप बिनविरोध), जयप्रकाश गोराडे(भाजप बिनविरोध),
निधोना गटातून:-तारू मेटे(भाजप 3586),अशोक साबळे(भाजप 3451), आबाराव सोनवणे(कॉंग्रेस 3464),
भोकरदन गटातून:-गणेश ठाले(भाजप बिनविरोध), दादाराव राऊत(भाजप बिनविरोध), गणपत सपकाळ(भाजप बिनविरोध),
सोसायटी मतदारसंघातून:-विष्णू जांभुळकर(भाजप 43),
अनुसूचित जाती जमाती राखीव मतदारसंघातून:-चंद्रशेखर शिरसाठ(भाजप 3596),
महिला राखीव मतदारसंघातून:- जिजाबाई दाभाडे(भाजप 3514), गयाबाई गावंडे(भाजप 3516),
इतर मागासवर्गीय मतदारसंघातून:- पद्मामाबाई जीवरग(भाजप 3543),
भटक्या जाती जमाती मतदारसंघातून:-विठ्ठल बकले(भाजप 3680) हे संचालक निवडून आले आहे.
शिवसेनेचा दारुण पराभव.......
शिवसेनेचे नगरसेवक सुदर्शन अग्रवाल यांना केवळ 182 मते मिळाली. महेंद्र बावस्कर यांना 248 मते,पोपट तायडे यांना केवळ 01 मत मिळाल्याने या तिन्ही शिवसेनेच्या उमेदवारांचा दारुण पराभव झाला.
इतर पराभूत उमेदवार व त्यांना मिळालेली मते.....
कैलास जंजाळ (455),मोरे पुंडलीक (291), काकासाहेब राकडे (179),साहेबराव तुपे (223),
नारायण मोरे (277),रघुनाथ कल्याणकर (63),हीराबाई गाढेकर (170),बाळकृष्ण बंसोड़ (185), हरिदास ताठे (346),( फोटो)
विजयी मिरवणूक व सत्कार
21 पैकी 19 संचालक भाजप चे निवडुन आले. यामुळे त्यांची विजयी मिरवणूक काढून सिल्लोड येथील भाजप कार्यालयात सर्व नवनिर्वाचित संचालकांचा सत्कार करण्यात आला.