मेट्रोच्या उद्घाटनास विलंबाच्या निषेधार्थ भाजपचे रास्तारोको आंदोलन
By admin | Published: June 7, 2014 04:22 PM2014-06-07T16:22:43+5:302014-06-07T17:09:04+5:30
मेट्रो रेल्वेच्या उद्घाटनास विलंब झाल्याच्या निषेधार्थ रास्तारोको करणा-या भाजपचे किरीट सोमय्या, गोपाळ शेट्टी यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
Next
>ऑनलाइन टीम
मुंबई, दि. ७ - मेट्रो रेल्वेच्या उद्घाटनास विलंब झाल्याच्या निषेधार्थ रास्तारोको करणा-या भाजपचे खासदार किरीट सोमय्या व गोपाळ शेट्टी यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सर्वसामान्य जनतेसाठी असणा-या मेट्रो रेल्वेच्या उद्घाटनाला विलंब होत असल्याने भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आपण शनिवारीच मेट्रोतून प्रवास करणार असल्याचे सांगितले होते. त्याप्रमाणे शनिवारी दुपारी सोमय्या हे त्यांच्या कार्यकर्त्यांसह घाटकोपर येथील मेट्रो स्थानकाजवळ आले असता तेथील प्रवेश बंद ठेवण्यात आला होता. तयामुळे चिडलेल्या सोमय्या व भाजप कार्यकर्त्यांनी स्टेशनजवळच धरणे आंदोलन सुरू केले. यामुळे परिसरातील वाहतूकीचा खोळंबा झाला व तणावाचे वातावरण निर्माण झाले. परिस्थिती आणखी चिघळू नये यासाठी पोलिसांनी सोमय्या व शेट्टी यांना ताब्यात घेतले.