मतदानापूर्वीच भाजपाचे रवी लांडगे बिनविरोध

By admin | Published: February 8, 2017 03:22 AM2017-02-08T03:22:12+5:302017-02-08T03:22:12+5:30

पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत उमेदवारी अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी भोसरीतील प्रभाग क्रमांक सहा धावडे वस्तीमधील क जागेवरील भाजप युवा मोर्चाचे शहराध्यक्ष

BJP's Ravi Ladge uncontested before the vote | मतदानापूर्वीच भाजपाचे रवी लांडगे बिनविरोध

मतदानापूर्वीच भाजपाचे रवी लांडगे बिनविरोध

Next

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत उमेदवारी अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी भोसरीतील प्रभाग क्रमांक सहा धावडे वस्तीमधील क जागेवरील भाजप युवा मोर्चाचे शहराध्यक्ष रवी लांडगे यांची बिनविरोध निवड झाली. त्यामुळे भाजपाने महापालिका निवडणुकीत खाते खोलले आहे.
रवी लांडगे भाजपाचे माजी शहराध्यक्ष अंकुश लांडगे यांचे पुतणे आहेत. प्रभाग क्रमांक ६ मधून उमेदवारासाठी ते इच्छुक होते. चार दिवसांपूर्वी त्यांनी भोसरी विधानसभेतील भाजपाच्या नेतृत्वावर थेट टीका करून प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याकडे तक्रार केली होती. अंकुश लांडगेंच्या खुन्याला भाजपातून उमेदवारी दिली जात आहे. ती देऊ नये, अशी मागणी केली होती. त्यामुळे उमेदवारीवरून भोसरीत दोन गट असल्याची चर्चा सुरू होती.
रवी लांडगे यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर या प्रभागातून राष्ट्रवादी, शिवसेना व मनसेने उमेदवार दिले नव्हते. लांडगेंना सहानुभूती मिळावी, यासाठी अंकुश लांडगे यांच्या जुन्या मित्रांनी पक्षांचे उमेदवार दिले नाहीत. मात्र, आमदार महेश लांडगे व माजी आमदार विलास लांडे यांच्यात श्रेयावरून स्पर्धा लागली आहे.
थेरगावातील प्रभागातून राष्ट्रवादीकडून उमेदवारी न मिळाल्याने आमदार लक्ष्मण जगताप समर्थक झामा बारणे यांनी भाजपात प्रवेश केला. याच प्रभागातून भाजपाच्या अधिकृत उमेदवार रेश्मा बारणे यांनी माघार घेतली आहे.(प्रतिनिधी)

भोसरीत आमदारांच्या भावासाठी ‘सेटिंग’
१पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या गवळीनगर प्रभागातील भाजपाचे अधिकृत उमेदवार व ज्येष्ठ माजी नगरसेवक अमृत पऱ्हाड यांनी आश्चर्यकारकपणे माघार घेतली. भोसरीचे आमदार महेश लांडगे यांच्या भावासाठी पऱ्हाड यांचा राजकीय बळी दिल्याची चर्चा भोसरी विधानसभा मतदार संघात आहे. तर चिंचवडमध्ये भाजपाची अधिकृत उमेदवारी मागे घेऊन अपक्ष उमेदवारास पुरस्कृत करण्याची खेळी खेळली जात आहे.
२ महापालिका निवडणुकीत भोसरी विधानसभा आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघात अनेक घडामोडी घडत आहेत. भारतीय जनता पक्षांतील जुन्या नव्यांचा वाद उफाळून आला आहे. शहरातील १२८ पैकी दोन जागांवर भाजपाने अर्ज मागे घेऊन अपक्षांना पुरस्कृत केले आहे.
३गवळीनगर प्रभागातील पऱ्हाड यांनी भाजपाकडून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे एबी फॉर्म देखील सादर केला होता. मात्र, ऐनवेळी त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यांना भाजपाच्या नेत्यांनी अर्ज मागे घेण्याची विनंती केल्याची चर्चा आहे. दरम्यान निष्ठावान कार्यकर्त्यांना डावलून नव्याने पक्षात आलेल्यांना उमेदवारी देण्यास विरोध केला जात आहे. आमदारांच्या भावासाठी पऱ्हाड यांचा बळी दिला आहे, अशी चर्चा आहे. आमदार बंधू सचिन लांडगे हे भाजप पुरस्कृत उमेदवार झाले आहेत.

Web Title: BJP's Ravi Ladge uncontested before the vote

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.