भाजपाच्या ज्येष्ठ नगरसेविका शैलजा गिरकर यांचे निधन
By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2017 10:15 PM2017-09-10T22:15:20+5:302017-09-10T22:40:01+5:30
भाजपा नगरसेविका शैलजा गिरकर यांचे आज (रविवार) निधन झाले. माजी उपमहापौर राहिलेल्या शैलजा गिरकर यांचं अल्पशा आजारानं निधन झालंय. वयाच्या 58व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. शैलजा गिरकर कांदिवली पश्चिम मतदारसंघाचं भाजपाकडून प्रतिनिधित्व करत होत्या.
मुंबई, दि. 10 - भाजपा नगरसेविका शैलजा गिरकर यांचे आज (रविवार) निधन झाले. माजी उपमहापौर राहिलेल्या शैलजा गिरकर यांचं अल्पशा आजारानं निधन झालंय. वयाच्या 58व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. शैलजा गिरकर कांदिवली पश्चिम मतदारसंघाचं भाजपाकडून प्रतिनिधित्व करत होत्या. 1997पासून आजपर्यंत जवळपास 20 वर्षं त्या नगरसेविका राहिल्या होत्या. चारकोपमधील वॉर्ड क्रमांक 21मधील नगरसेविका आणि आमदार विजय (भाई) गिरकर यांच्या त्या पत्नी होत. शैलजा गिरकर यांच्या जाण्यानं मुंबईत भाजपाचा एक नगरसेवक कमी झाला आहे.
संसर्गजन्य तापामुळे त्यांनी शनिवारी सकाळी कांदिवली येथील ऑस्कर रुग्णालयात हलवण्यात आले. प्रकृती काहीशी सुधारत असतानाच त्यांना अचानक हृदयविकाराचा झटका आला. यावेळी त्यांचे पती माजी राज्यमंत्री भाई गिरकर व चार डॉक्टरही तेथे उपस्थित होते. हृदयविकाराचा धक्का एवढा तीव्र स्वरूपाचा होता की, त्यांचं तात्काळ निधन झालं. शैलजा गिरकर यांनी 2001 ते 2003 या कालावधीत मुंबईचे उपमहापौरपद भूषवले होते. महिला व बालकल्याण, स्थापत्य समिती अध्यक्षा म्हणूनही त्यांनी काम पाहिले होते. त्यांच्या पश्चात पती माजी राज्यमंत्री भाई गिरकर, एक मुलगा व एक मुलगी, नातवंडे असा परिवार आहे. कांदिवली येथील डहाणूकरवाडी स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत.