कांद्याच्या घसरत्या भावाचा नगरला भाजपाला फटका

By admin | Published: February 27, 2017 05:05 AM2017-02-27T05:05:24+5:302017-02-27T05:05:24+5:30

कांद्याच्या घसरत्या भावाचा जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपाला फटका बसला आहे.

The BJP's slaying of the onion-laden brother fell on the BJP | कांद्याच्या घसरत्या भावाचा नगरला भाजपाला फटका

कांद्याच्या घसरत्या भावाचा नगरला भाजपाला फटका

Next


अहमदनगर : कांद्याच्या घसरत्या भावाचा जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपाला फटका बसला आहे. शेतकऱ्यांनी मतपेटीतून राज्य सरकारवर नाराजी व्यक्त केल्याने पक्षाच्या ‘फोर्टी प्लस’च्या महत्त्वाकांक्षेचा वांदा झाला.
संपूर्ण देशाला कांदा पुरवणारे राज्य म्हणून महाराष्ट्राचा लौकिक आता मावळत चालला आहे. त्यात नाशिक खालोखाल नगर जिल्हा आघाडीवर आहे. कांदा शेतकऱ्यांसाठी मोठा आर्थिक आधारवड ठरू लागल्याने जिल्ह्यात गेल्या वर्षभरात कांदा उत्पादनात कमालीची वाढ झाली. ऊस उत्पादक शेतकरी सुद्धा कमी पाणी, लागवड खर्च कमी म्हणून कांदा लागवडीकडे वळले. जिल्ह्यात यंदाच्या मोसमात सुमारे १५ लाख टन इतके उत्पादन झाले. मात्र दक्षिण भारतातील कर्नाटक, आंध्र प्रदेश, तमीळनाडू तसेच राजस्थान, मध्यप्रदेश, गुजरात या राज्यांतही यावर्षी कांदा उत्पादन वाढले. परिणामी कांद्याची देशांतर्गत मागणी घटली. त्याचा परिणाम भावावरही झाला.
वर्षभरापासून कांदा ७०० ते ८०० रुपये प्रतिक्विंटल विकला जात आहे. लागवडीसाठीचा खर्च पाहता सध्याचे भाव शेतकऱ्यांना परवडणारे नाहीत.
शेतकऱ्यांनी जि. प. च्या निवडणुकीत मतपेटीतून त्यावर नाराजी व्यक्त केल्याचे चित्र आहे. मोठ्या शहरांत भाजपाला यश मिळाले तरी जिल्ह्यातील ग्रामीण भागातील लोकप्रियतेत मात्र घट झाल्याचे दिसून आले. (प्रतिनिधी)

Web Title: The BJP's slaying of the onion-laden brother fell on the BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.