विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपची राज्यस्तरीय संवाद यात्रा, पुण्यात ५००० पदाधिकाऱ्यांचे अधिवेशन होणार!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2024 08:21 PM2024-07-15T20:21:08+5:302024-07-15T21:07:45+5:30

Chandrashekhar Bawankule : नागपूर येथे चंद्रशेखर बावनकुळे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, महाराष्ट्रातील भाजपाचे १९ वरिष्ठ नेते संवाद यात्रेत सहभागी होतील.

BJP's state-level Samvad Yatra, a convention of 5000 office-bearers will be held in Pune - Chandrashekhar Bawankule | विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपची राज्यस्तरीय संवाद यात्रा, पुण्यात ५००० पदाधिकाऱ्यांचे अधिवेशन होणार!

विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपची राज्यस्तरीय संवाद यात्रा, पुण्यात ५००० पदाधिकाऱ्यांचे अधिवेशन होणार!

विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप राज्यस्तरीय संवाद यात्रेच्या माध्यमातून राज्यातील कानाकोपऱ्यात पोहचणार आहे. येत्या २१ जुलै रोजी पुण्यात राज्यातील पाच हजार भाजप पदाधिकाऱ्यांचे अधिवेशन होणार असून, त्यात केंद्रीय मंत्री अमित शाह, नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत संवाद यात्रेची रूपरेषा, तसेच तारीख निश्चित केली जाणार असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी दिली.
 
नागपूर येथे चंद्रशेखर बावनकुळे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, महाराष्ट्रातीलभाजपाचे १९ वरिष्ठ नेते संवाद यात्रेत सहभागी होतील. ही यात्रा सर्व ४८ लोकसभा, सर्व विधानसभा तसेच जिल्हा परिषद व पचायत समिती गट आणि नगर पालिका क्षेत्रात पोहोचेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने तिसऱ्या टर्ममध्ये घोषित केलेली कामे व महायुती सरकारने अर्थसंकल्पात जाहीर केलेल्या कामाची माहिती, सरकारने घेतलेले निर्णय जनसामान्यांपर्यंत पोहचविणार आहोत.
 
समाजातील सर्व घटकांना केंद्र व राज्य सरकारच्या योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे. या संवाद यात्रेचा समारोप विधानसभानिहाय होणार आहे. २१ जुलैच्या पुणे अधिवेशनापूर्वी १९ जुलैला मुंबईत संघटनात्मक बैठक होणार असून, महाराष्ट्र विधानसभा पक्ष प्रभारी भूपेंद्र यादव आणि सहप्रभारी अश्विनी वैष्णव बैठकीला उपस्थित राहणार असल्याची माहिती चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.

विरोधकांची भूमिका निंदनीय - चंद्रशेखर बावनकुळे 
आरक्षण विषयासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी बोलाविलेल्या सर्वपक्षीय बैठकीवर विरोधी पक्षांच्या नेत्यांनी बहिष्कार टाकून योग्य केले नाही. मराठा आणि ओबीसी समाजाच्या हितासाठी ही बैठक होती. विरोधकांची भूमिका निंदनीय आहे. अशी भूमिका महाराष्ट्राच्या हिताची नाही. विरोधक जातीपातीचा राजकारण करत आहे, हे जनतेला दिसले. चुकून महाराष्ट्रात मविआ सरकार आले तर लोकांच्या लाभाच्या योजना बंद होतील. महाराष्ट्रातील जनतेला डबल इंजिन सरकार हवे आहे, असेही चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

Web Title: BJP's state-level Samvad Yatra, a convention of 5000 office-bearers will be held in Pune - Chandrashekhar Bawankule

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.