गोमांसबंदीवरून भाजपाची पलटी! मालेगावमध्ये बंदी उठवण्याचे आश्वासन

By admin | Published: May 23, 2017 06:56 PM2017-05-23T18:56:07+5:302017-05-23T18:56:07+5:30

एकीकडे भाजपा आणि त्याच्या समर्थक संघटना गोमांस बंदीसाठी आकाशपाताळ एक करत असताना दुसरीकडे मतांच्या राजकारणासाठी भाजप उमेदवार मात्र

BJP's turnkey turnaround! Rest assured to ban in Malegaon | गोमांसबंदीवरून भाजपाची पलटी! मालेगावमध्ये बंदी उठवण्याचे आश्वासन

गोमांसबंदीवरून भाजपाची पलटी! मालेगावमध्ये बंदी उठवण्याचे आश्वासन

Next
>ऑनलाइन लोकमत
मालेगाव, दि. 23 -  एकीकडे भाजपा आणि त्याच्या समर्थक संघटना गोमांस बंदीसाठी आकाशपाताळ एक करत असताना दुसरीकडे मतांच्या राजकारणासाठी भाजप उमेदवार मात्र पक्षाच्या भूमिकेला बगल देत आहेत. मुस्लिम बहुल मालेगाव महानगरपालिका निवडणुकीमध्ये मतांचे राजकारण विचारात घेऊन भाजपा उमेदवार सत्तेत आल्यास गोमांस बंदी उठवण्याचे आश्वासन देत फिरत आहेत. तर तिहेरी तलाक हा मुस्लिमांचा आधार असल्याचेही भाजपा उमेदवारांचे मत आहे. 
 
मालेगाव महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी उद्या मतदान होणार आहे. या शहरात मुस्लिम मतदार मोठ्या प्रमाणावर असल्याने भाजपाने येथील 21 प्रभागातील 83 जागांपैकी 29 जागांवर मुस्लिम उमेदवार दिले आहेत. आता मुस्लिम बहूल भागातून निवडून येण्यासाठी भाजपा उमेदवारांकडून पक्षाच्या मूळ भूमिकेहून विसंगत भूमिका घेतली जात आहे.  
 
 उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीत एकाही मुस्लिम उमेदवाराला तिकीट न देणाऱ्या भाजपाने मालेगाव महापालिकेत तब्बल 29 मुस्लिम उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवत मुस्लिम कार्डाचा केलेला देशभरातील पहिलाच प्रयोग कितपत यशस्वी ठरतो याकडे सर्वांच्याच नजरा खिळून आहेत. 
 
मालेगाव महापालिकेसाठी उद्या मतदान होत असून सत्ता काबीज करण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. शहराच्या पूर्व भागात कॉँग्रेस व राष्ट्रवादी- जनता दलमध्ये सरळ-सरळ सामना होत आहे तर पश्चिम भागात शिवसेना व भाजपाचे उमेदवार आमने-सामने उभे ठाकले आहेत. मनपाच्या 21 प्रभागातून 84 नगरसेवक निवडून जाणार आहेत. कॉँग्रेसची एक जागा बिनविरोध झाल्यामुळे आता 83 जागांसाठी मतदान होत आहे. निवडणूक रिंगणातील 373 पक्षीय उमेदवारांसमोर 99 अपक्षांचे कडवे आव्हान आहे.
 

Web Title: BJP's turnkey turnaround! Rest assured to ban in Malegaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.