भाजपाचे दुटप्पी धोरण
By Admin | Published: July 16, 2015 02:07 AM2015-07-16T02:07:44+5:302015-07-16T02:07:44+5:30
मुंबईतील नालेसफाईवरून मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी शिवसेनेला टीकेचे लक्ष्य केले असले तरी विरोधकांनी याच विषयावर विचारलेल्या प्रश्नांवर
मुंबई : मुंबईतील नालेसफाईवरून मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी शिवसेनेला टीकेचे लक्ष्य केले असले तरी विरोधकांनी याच विषयावर विचारलेल्या प्रश्नांवर उत्तर देताना नगरविकास विभागाला नाइलाजास्तव का होईना महापालिकेची पाठराखण करावी लागत असल्याचे चित्र दिसत आहे.
पालिकेच्या कंत्राटदारधार्जिण्या धोरणामुळे नालेसफाईला
विलंब झाल्याचा मुद्दा विरोधकांनी प्रश्नाच्या माध्यमातून उपस्थित केल्यावर नगरविकास विभागाला त्याचा नकार देण्याखेरीज दुसरा पर्याय उरत नाही. नालेसफाईच्या कामाकरिता २८५ कोटी रुपये
खर्च करण्याचा प्रस्ताव कोणत्याही चर्चेविना मंजूर झाला हे खरे
आहे किंवा कसे या विरोधकांच्या शंकेवर स्थायी समितीमध्ये चर्चेनंतर हा प्रस्ताव मंजूर झाल्याचे नगरविकास विभागाला स्पष्ट करावे लागणे अनिवार्य झाले आहे.
याबाबत चौकशी करून कारवाई करण्याचा प्रश्न विरोधकांनी केल्यावर ही शक्यता फेटाळून लावणे नगरविकास विभागाला अपरिहार्य झाले आहे. (विशेष प्रतिनिधी)
टोलेबाजी
जून महिन्यात मुंबईत एकाच दिवशी ३०० मि.मी. पाऊस झाल्याने रेल्वे व रस्ते वाहतूक ठप्प झाली. त्यावर मुंबई
भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी शिवसेनेला लक्ष्य करीत नालेसफाईच्या कामावर टीका केली होती.
ही टीका शिवसेनेच्या इतकी
वर्मी लागली की, गुजरातमध्ये व दिल्लीत पावसामुळे वाहतूक ठप्प झाल्यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपाला टोले हाणले होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी व पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ भेटीवर शिवसेनेने टीका केल्यावरही शेलार यांनी नालेसफाईवरून लक्ष्य केले होते.