Assembly Election Results: "भाजपचा विजय हा त्यांच्या...;" BJPच्या बंपर विजयावर राऊतांनी दिली अशी प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2022 03:55 PM2022-03-10T15:55:14+5:302022-03-10T15:56:45+5:30
काँग्रेसचा अत्यंत वाईट पद्धतीने पराभव झाला आहे. गोवा आणि उत्तराखंडमध्ये त्यांना विजय मिळेल, असे वाटत होते. मात्र...
देशात उत्तर प्रदेशसह पाच राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत चार राज्यांत भाजपची हवा दिसून आली आहे. आतापर्यंत आलेले निकाल आणि ट्रेंड पाहता, यूपीसह उत्तराखंड, गोवा आणि मणिपूरमध्ये भाजप पुन्हा सत्तेवर येताना दिसत आहे. यासंदर्भात शिवसेना नेते संजय राऊत यांची प्रतिक्रिया दिला आहे. भाजपचा हा विजय निवडणूक व्यवस्थापनाचा विजय असल्याचे राऊतांनी म्हटले आहे.
शिवसेना नेते संजय राऊत म्हणाले, 'या निवडणुकीत काँग्रेस पक्षाला अत्यंत वाईट पद्धतीने पराभवाचा सामना करावा लागला आहे. आम्हाला अपेक्षित रिझल्ट मिळाला नाही. पंजाबमधील लोकांना आणखी एक पर्याय मिळाला आणि त्यांनी AAP ला निवडले. भाजपचा विजय हा त्यांच्या निवडणूक व्यवस्थापनाचाही (Election Management) विजय आहे.'
Congress party has lost badly in these elections. We didn't get the expected results. In Punjab people got another option and elected AAP. BJP's win is a victory of their election management too: Shiv Sena leader Sanjay Raut on assembly election results pic.twitter.com/T8D0Luz5uk
— ANI (@ANI) March 10, 2022
राऊत म्हणाले, 'ज्या राज्यांमध्ये ज्या पक्षांचा विजय झाला, मी त्यांचे पक्षाच्या वतीने अभिनंदन करतो. काँग्रेसचा अत्यंत वाईट पद्धतीने पराभव झाला आहे. गोवा आणि उत्तराखंडमध्ये त्यांना विजय मिळेल, असे वाटत होते. मात्र त्यांचा पराभव झाला. तसेच, अखिलेश आणि त्यांच्या सोबतच्या पक्षांकडूनही अपेक्षा होती. मात्र, त्यांची कामगिरीही तेवढी चांगली राहिली नाही.'