काळ्या फिती लावून निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2018 11:46 PM2018-03-08T23:46:01+5:302018-03-08T23:46:01+5:30

जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष दत्ता ढोमणे यांनी बुधवारी भातकुली पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सागर पाटील यांना मारहाण केल्याच्या निषेधार्थ ८ मार्च रोजी महाराष्ट्र राज्य विकास सेवा राजपत्रित संघटनेच्या जिल्हा शाखेतर्फे या घटनेचा काळ्या फिती लावून निषेध नोंदविण्यात आला.

Black clips protests | काळ्या फिती लावून निषेध

काळ्या फिती लावून निषेध

Next

आॅनलाईन लोकमत
अमरावती : जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष दत्ता ढोमणे यांनी बुधवारी भातकुली पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सागर पाटील यांना मारहाण केल्याच्या निषेधार्थ ८ मार्च रोजी महाराष्ट्र राज्य विकास सेवा राजपत्रित संघटनेच्या जिल्हा शाखेतर्फे या घटनेचा काळ्या फिती लावून निषेध नोंदविण्यात आला.
यावेळी जिल्हा परिषद मुख्यकार्यकारी अधिकारी के.एम अहमद, पोलीस आयुक्त दतात्रय मंडलिक यांना सर्व बीडीओंनी निवेदन देऊ न मारहाणप्रकरणी उपाध्यक्ष दत्ता ढोमणे यांच्या फौजदारी कारवाई करण्याची मागणी केली आहे.
निवेदन देतेवेळी अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी विनय ठमके, विकास सेवा राजपत्रित संघटनेचे जिल्हाध्यक्ष अरविंद गुडधे, बीडीओ बाळासाहेब अकलाडे, बाळासाहेब रायबोले, रामकृष्ण पवार, नरेंद्र धारगे, कुलदीप भोगे, सुरेश थोरात, विशाल शिंदे, व्ही.एस. राठोड, उमेश देशमुख, प्रणोती श्रीश्रीमाळ, सोनाली माडकर, संजय काळे, प्रफुल्ल भोरखडे, एस.डी काळे व अन्य अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

Web Title: Black clips protests

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.