प्रजासत्ताक दिनी नक्षलवाद्यांनी जिल्हा परिषद शाळेवर फडकविला काळा झेंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 26, 2017 07:56 PM2017-01-26T19:56:03+5:302017-01-26T20:00:07+5:30

संतोष बुकावन/प्रकाश वलथरे ऑनलाइन लोकमत गोंदिया, दि. 26 : गोंदिया जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातील राजोली येथे ...

Black Flag on Republic Day's naxalism stamped on Zilla Parishad School | प्रजासत्ताक दिनी नक्षलवाद्यांनी जिल्हा परिषद शाळेवर फडकविला काळा झेंडा

प्रजासत्ताक दिनी नक्षलवाद्यांनी जिल्हा परिषद शाळेवर फडकविला काळा झेंडा

Next

संतोष बुकावन/प्रकाश वलथरे

ऑनलाइन लोकमत
गोंदिया, दि. 26 : गोंदिया जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातील राजोली येथे ऐन प्रजासत्ताक दिनी नक्षलवाद्यांनी तिरंगी ध्वजाच्या स्तंभावर काळा झेंडा फडकविला. एवढेच नाही तर शासनाला धोरणाविरूद्ध आवाहन करणारे बॅनर आणि हस्तलिखित पत्रके भरनोली ग्रामपंचायत व शाळेसमोरील लावली. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली. पोलीस यंत्रणेने संपूर्ण जागेची बॉम्ब शोधक व नाशक पथकामार्फत तपासणी केल्यानंतर काळा झेंडा उतरवून दुपारी १२.३५ वाजता तिरंगा ध्वज फडकविला.

हे कृत्य कोरची दलमच्या १० ते १२ नक्षल्यांनी येऊन मध्यरात्रीनंतर २ ते २.३० च्या सुमारास केल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला. सकाळी ध्वजारोहण सोहळ्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक आर.एम.गहाणे व शिक्षकवृंद शाळेत पोहोचल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. सकाळी ६.३० च्या सुमारास शाळेचे परिचर मनोहर चौधरी पोहोचले. त्यांना शाळेच्या प्रवेशद्वारावर कागदी पत्रके व बाजुच्या परिसरात कापडी फलक लावलेला दिसला. काही वेळातच मुख्याध्यापक आल्यानंतर त्यांचे लक्ष ध्वजस्तंभाकडे गेले तर तिथे काळा झेंडा लागला असल्याचे त्यांना दिसले. त्यांनी लगेच या प्रकाराची माहिती भ्रमणध्वनीद्वारे केशोरी पोलीस ठाण्यात दिली.

हा परिसर आधीपासूनच नक्षलदृष्ट्या संवेदनशिल असल्यामुळे शाळेपासून अवघ्या दोन किलोमीटरवर भरनोली येथे सशस्त्र पोलीस दूरकेंद्र (आर्म्स आऊट पोस्ट) आहे. मुख्याध्यापकांनी दिलेल्या माहितीवरून केशोरीचे ठाणेदार एस.एस.कुंभरे राजोलीत पोहोचले. तत्पूर्वी भरनोलीच्या दूरकेंद्रातील अधिकारी व जवान घटनास्थळी दाखल झाले होते. खबरदारी म्हणून पोलीस पोहोचल्याशिवाय काळा ध्वज उतरवू नका व ध्वज परिसरात विद्यार्थ्यांना जाऊ न देण्याची सूचना पोलिसांनी मुख्याध्यापकांना दिली. दरम्यान गोंदियावरून बॉम्ब शोध व नाशक पथक दुपारी १२ च्या सुमारास राजोलीत पोहोचले. मात्र त्यांच्या तपासणीत कोणतीही स्फोटक वस्तू जमिनीत किंवा ध्वजस्तंभालगत पेरून ठेवल्याचे आढळले नाही. त्यानंतर काळा झेंडा उतरवून शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रेशीम झोडे यांच्या हस्ते दुपारी १२.३५ च्या सुमारास विधीवत पुजन करून गावकऱ्यांच्या उपस्थितीत तिरंगा ध्वज फडकविण्यात आला. मात्र दिवसभर गावकऱ्यांमध्ये भितीयुक्त वातावरण होते.

नक्षल्यांचे काळा दिवसाचे आवाहन
नक्षल्यांनी ही कृत्य करताना लावलेले फलक व पत्रकांमध्ये केंद्र सरकारवरला टार्गेट केले. मोदी सरकार संविधानाला हटविण्याचा प्रयत्न करीत आहे. त्याला विरोध करा. धर्मनिरपेक्षतेच्या नावावर देशाला हिंदू राष्ट्र बनविण्यासाठी इतर धर्मियांवर हल्ला चढविण्याचे षडयंत्र आहे. या प्रकाराला काळा दिवस म्हणून पाळा. हे सर्वसामान्य जनतेचे प्रजासत्ताक नाही. जनतेच्या खऱ्या जनवादी राजसत्तेसाठी सुरू असलेल्या जनयुद्धात सामील होणे हाच एकमेव मार्ग आहे. खोट्या प्रजासत्ताकाला विरोध करा, असा मजकूर लाल शाईत लिहिलेला आहे. पत्रकात कोरची एरिया कमिटी, भाकपा माओवादी असे खाली नमूद आहे.

https://www.dailymotion.com/video/x844psm

Web Title: Black Flag on Republic Day's naxalism stamped on Zilla Parishad School

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.