Black Fungus: ह्दयद्रावक! ६ महिने बेडवर, १३ वेळा सर्जरी झाली अन् अखेर एक डोळा काढावा लागला

By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2021 11:26 AM2021-06-09T11:26:47+5:302021-06-09T11:28:41+5:30

नवीन पॉलच्या उपचारासाठी १ कोटी ४८ लाख रुपये खर्च झाले आहेत. यातील १ कोटी रुपये रेल्वेने खर्च केले आहेत.

Black Fungus Mucormycosis Survivers Shared Trauma Vision Loss Disfigured Faces In Maharashtra | Black Fungus: ह्दयद्रावक! ६ महिने बेडवर, १३ वेळा सर्जरी झाली अन् अखेर एक डोळा काढावा लागला

Black Fungus: ह्दयद्रावक! ६ महिने बेडवर, १३ वेळा सर्जरी झाली अन् अखेर एक डोळा काढावा लागला

googlenewsNext
ठळक मुद्देडोळा काढला तरी जीव वाचला म्हणून पॉल आनंदी आहेत. ब्लॅक फंगसनं त्यांचे जीवन उद्ध्वस्त केले.यवतमाळ येथे राहणाऱ्या निलेश बेंडे यांना ब्लॅक फंगसच्या संक्रमणामुळे दोन्ही डोळे गमवावे लागले.डोळ्यांची दृष्टी गमावल्यानंतर त्यांचे पती पूर्णपणे कोलमेडले. त्यांची हिंमत वाढवणंही कठीण झालं

नागपूर – कोरोना संक्रमणानंतर आता ब्लॅक फंगसनं लोकांची डोकेदुखी वाढवली आहे. ब्लॅक फंगस अथवा म्यूकोरमायकोसिस संक्रमणानं लोकांना कटू आठवणी दिल्या आहेत. ब्लॅक फंगसमुळं कोणाला स्वत:चे डोळे काढावे लागले तर कोणाला जबडा काढावा लागत आहे. अनेकांचे डोळे काढून त्यांना कृत्रिम डोळे बसवले जात आहेत. लोकांचे हे दु:ख ऐकून तुमच्याही डोळ्यात पाणी येईल.

१३ वेळा सर्जरी झाली अन् शेवटी डोळा काढावा लागला

डॉक्टरांचे म्हणणं आहे की, ४६ वर्षीय नवीन पाल हे मध्य भारत विदर्भातील ब्लॅक फंगस(Black Fungus)चे पहिले रुग्ण होते. मागील सप्टेंबर महिन्यात नवीनला कोरोना संक्रमणाची लागण झाली. काही दिवसांनी त्यांना डोळ्याची आणि दाताची समस्या जाणवली. डॉक्टरांनी तपासले असता त्यांना ब्लॅक फंगसची लागण झाल्याचं आढळलं. त्यानंतर ६ महिने त्यांच्यावर उपचार सुरू होते. यादरम्यान १३ वेळा त्यांच्यावर सर्जरी झाली परंतु अखेर संक्रमण रोखण्यास अयशस्वी ठरल्यानं त्यांना एक डोळा निकामी करावा लागला.

उपचारासाठी १ कोटी ४८ लाख रुपये खर्च

नवीन पॉलच्या उपचारासाठी १ कोटी ४८ लाख रुपये खर्च झाले आहेत. यातील १ कोटी रुपये रेल्वेने खर्च केले आहेत. पॉलची पत्नी रेल्वेत काम करते. ४८ लाख रुपये पॉल कुटुंबाला जमा करावे लागले. डोळा काढला तरी जीव वाचला म्हणून पॉल आनंदी आहेत. ब्लॅक फंगसनं त्यांचे जीवन उद्ध्वस्त केले.

कोविड सेंटरमध्येच डोळ्यासमोर अंधार  

यवतमाळ येथे राहणाऱ्या निलेश बेंडे यांना ब्लॅक फंगसच्या संक्रमणामुळे दोन्ही डोळे गमवावे लागले. मार्चमध्ये त्याला कोरोना संक्रमण झाले होते. काही महिन्यानंतर कोरोना चाचणी केल्यानंतर रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. यवतमाळच्या कोविंड सेंटरमध्ये त्यांना ठेवण्यात आलं. त्याठिकाणी त्यांच्या डोळ्यासमोर अंधार पसरला. उपचारावेळी १ डोळा काढावा लागला तर १० दिवसांनी डॉक्टरांनी सांगितले की, दुसरा डोळाही काढावा लागेल.

डोळे गमावल्यानंतर सगळं स्वप्न भंग झालं

निलेशची पत्नी वैशालीने सांगितले की, डोळ्यांची दृष्टी गमावल्यानंतर त्यांचे पती पूर्णपणे कोलमेडले. त्यांची हिंमत वाढवणंही कठीण झालं. निलेश एका खासगी सुरक्षा कंपनीत काम करतात. आजारपणामुळे त्यांची नोकरी गेली. मागील महिन्याचा पगारही त्यांना मिळाला नाही. मी मेलो असतो तरी बरं झालं असतं असं निलेश हताश होऊन म्हणतोय. तर कुटुंबाला तुमची गरज आहे असं पत्नी वैशालीचं म्हणणं आहे.

Web Title: Black Fungus Mucormycosis Survivers Shared Trauma Vision Loss Disfigured Faces In Maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.