काळ्याचे पांढरे करण्यासाठी दलाली!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2016 05:57 AM2016-11-15T05:57:53+5:302016-11-15T05:57:53+5:30
रद्द नोटा बदलून देण्यासाठी आता टक्केवारीचा खेळ सुरू झाला असून तीस टक्क्यांपर्यंत पैसे घेऊन काहींकडून पाचशे व हजाराच्या नोटा स्वीकारण्याचे प्रकार सुरू
नाशिक : रद्द नोटा बदलून देण्यासाठी आता टक्केवारीचा खेळ सुरू झाला असून तीस टक्क्यांपर्यंत पैसे घेऊन काहींकडून पाचशे व हजाराच्या नोटा स्वीकारण्याचे प्रकार सुरू झाल्याची चर्चा आहे. कमी रक्कम असणाऱ्यांनी परिचितांमार्फत अडीच लाखांपेक्षा कमी रक्कम भरण्यासाठी १० ते २० टक्के देण्याची तयारी सुरू केली आहे.
बाजारातील काळा पैसा कमी करण्यासाठी नवा काळाबाजार सुरू झाला की काय, अशी शंका त्यामुळे सुरू झाली आहे. नोटा रद्दच्या घोषणेनंतर व्यवसाय किंवा अन्य कारणांसाठी लाखो रुपयांची रोकड बाळगणाऱ्यांची मोठी अडचण झाली आहे.
एवढ्या मोठ्या प्रमाणात रोकड जमा करता येऊ शकते, मात्र ते आयकर खात्याच्या रडारवर येण्याची भीती वाटत असल्याने सर्व आटापीटा सुरू आहे. अनेक व्यवहार स्थानिक स्तरावर करण्यात येत असले तरी बरेच जण मुंबईहून नोटा बदलून आणाव्या लागतात असे सांगून या व्यवहारात सामील झाल्याचे सांगण्यात येत आहे. (प्रतिनिधी)