काळ्या-पिवळ्या टॅक्सीतही प्रवाशांच्या मागणीनुसार एसी
By admin | Published: April 15, 2017 02:18 AM2017-04-15T02:18:07+5:302017-04-15T02:18:07+5:30
राज्यातील महानगरांमध्ये बिगर एसीच्या काळ्या-पिवळ्या टॅक्सी आणि एसी कुल कॅब धावत आहेत. मात्र काळ्या-पिवळ्या टॅक्सींमध्ये एसी असूनही शासनाची मान्यता
मुंबई : राज्यातील महानगरांमध्ये बिगर एसीच्या काळ्या-पिवळ्या टॅक्सी आणि एसी कुल कॅब धावत आहेत. मात्र काळ्या-पिवळ्या टॅक्सींमध्ये एसी असूनही शासनाची मान्यता नसल्याने एसी सेवा प्रवाशांना देता येत नव्हती. आता शासन मंजुरी मिळाल्याने प्रवाशांच्या मागणीनुसार त्यांना एसी सेवा देता येणार आहे. त्यासाठी प्रवाशांना नियमित भाडे दरावर २0 टक्के जादा भाडे आकारले जाईल.
शासनाच्या निर्णयानुसार काळ्या-पिवळ्या टॅक्सींमध्ये एसी यंत्रणा चालू स्थितीत असेल आणि प्रवाशाने मागणी केल्यास ती सेवा २० टक्के जादा भाडे आकारून टॅक्सी चालक देऊ शकतो. ज्या टॅक्सींना एसी यंत्रणा असेल अशा वाहनाच्या समोरच्या काचेवर लाल अक्षरात ‘एसी’ असा लोगो लावण्याची सूचनाही शासनाकडून करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)