किशोरवयीन मुलीला ब्लॅकमेल करून अडीच किलो सोने हडपले!
By admin | Published: January 20, 2017 02:48 AM2017-01-20T02:48:56+5:302017-01-20T02:48:56+5:30
पीडितेचे शारीरिक शोषणही केले; मोठय़ा भावासह आईने दिली आरोपी युवकाची साथ.
मूर्तिजापूर, दि. १९- शहरातील एका अल्पवयीन युवतीला प्रेमाच्या जाळ्य़ात ओढून तिचे शारीरिक शोषण केल्याचा प्रकार उजेडात आला आहे. विशेष म्हणजे आरोपी युवकाच्या भावासह त्याच्या आईने या कामी त्याची साथ दिली असून, युवतीला ब्लॅकमेल करून तिच्याकडून अडीच किलो सोने हडपले आहे. या प्रकरणी मूर्तिजापूर शहर पोलिसांनी तिघांविरुद्ध विविध कलमान्वये मागील आठवड्यात गुन्हा दाखल केला आहे.न्यायालयात हजर केले असाता आरोपिांना न्यायालयाने २५ जानेवारीपर्यंत पोलस कोठडी सुणावली आहे.
मूर्तिजापूर शहरातील एका १७ वर्षीय युवतीची मनीष शर्मा नामक युवकाशी ओळख झाली. युवतीची आर्थिक परिस्थिती चांगली असल्याची बाब हेरून मनीषने तिला आपल्या प्रेम जाळ्य़ात ओढले आणि तिचे शारीरिक शोषणही केले. काही दिवसांनी मनीषने त्या युवतीला घरून रोख रक्कम व दागिने आणण्यास सांगितले. तिने नकार दिल्यानंतर काही आक्षेपार्ह छायाचित्रे इंटरनेटच्या माध्यमातून प्रसारित करण्याची धमकी दिली. त्यामुळे, युवतीने भीतीपोटी रोख रक्कम व दागिने मनीषला आणून दिले. मनीषची लालसा वाढत गेल्याने त्याने आणखी पैसे आणि दागिन्यांची मागणी केली. युवतीने नकार देण्याचा प्रयत्न केला असता, आरोपी युवकाचा मोठा भाऊ आणि आईनेही बदनामी करण्याची धमकी दिली. त्यामुळे, सदर अल्पवयीन मुलीने अनेक वेळा रोख रक्कम व जवळपास अडीच किलो सोने मनीषला आणून दिले. हा प्रकार सुरूच राहिल्याने कंटाळलेल्या अल्पवयीन युवतीने अखेर ही बाब जवळच्या नातेवाइकांना सांगितली. त्यानंतर नातेवाइकांनी पोलिसात फिर्याद दिली.
विविध कलमान्वये गुन्हा
अल्पवयीन युवतीचे शारीरिक शोषण केल्याप्रकरणी मनीष शर्मा विरुद्ध भादंविच्या कलम ३७६, बाल लैंगिक संरक्षण अधिनियम (पॉस्को) अंतर्गत शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे ब्लॅकमेलिंग करून फसवणूक केल्याप्रकरणी मनीषसह त्याचा भाऊ व आईविरुद्धही मूर्तिजापूर शहर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. पुढील तपास ठाणेदार गजानन पडघन करीत आहेत.
दोन आरोपींना पोलीस कोठडी
या प्रकरणात मनीष व त्याच्या भावाला पोलिसांनी न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने दोघांनाही २५ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तर मनीषच्या आईला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.
सोने खरेदी करणारा सराफाही गजाआड
ब्लॅकमेल करणार्या मनीषक डून अवैधरित्या सोने खरेदी करणार्या वाकोडे नामक सराफा व्यावसायिकाला पोलिसांनी अटक केली. त्याला न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्याला २१ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
पीडित युवतीचे बयान नोंदवले!
शारीरिक शोषण झालेली युवती अल्पवयीन असल्याने या प्रकरणात महिला व बाल कल्याण समितीने बयान नोंदवले आहे.