लोहाऱ्यात चोऱ्या वाढल्या
By Admin | Published: June 7, 2016 07:32 AM2016-06-07T07:32:03+5:302016-06-07T07:32:04+5:30
लोहारा : लोहारा शहरासह तासुक्यात मागील महिनाभरापासून चोरीच्या घटना वाढत असून, लहान मुले देखील बेपत्ता होत असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
लोहारा : लोहारा शहरासह तासुक्यात मागील महिनाभरापासून चोरीच्या घटना वाढत असून, लहान मुले देखील बेपत्ता होत असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
प्रत्येक शुक्रवारी येथे भरणाऱ्या आठवडी बाजारात परिसरातील सत्तर ते ऐंशी गावातून नागरिक येतात. याच गर्दीचा फायदा घेत मोबाईल, पाकीटमारीच्या घटना घडत आहेत. शिवाय दुचाकी, सायकल आदी चोरीच्या घटनाही वाढल्या आहेत. ४ जून रोजी सायंकाळी तालुक्यातील नागराळ (लो) येथून एक सायकल, तर ५ जून रोजी मध्यरात्रीच्या सुमारास शहरातील एकाची दुचाकी चोरीस गेली आहे. या चोऱ्यांसोबतच लहान मुले गायब होण्याचे प्रमाणही वाढले आहे. काही दिवसांपूर्वीच दहा ते बारा वयोगटातील दोन मुले बेपत्ता झाली होती. त्यांचा शोध लागतो न लागतो तोच ४ जून रोजी मठपती नामक व्यक्तीचा बारा वर्षांचा मुलगा बेपत्ता झाला आहे.
याबाबत येथील प्रभारी पोलीस निरीक्षक मेंगडे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, यापूर्वी बेपत्ता झालेली दोन मुले मिळाली असून, मठपती यांच्या मुलासंदर्भात नातेवाईकांनी आपली भेट घेतली आहे. त्यांनी विविध ठिकाणी शोध घेऊनही तो सापडला नसल्याने त्यांनी आजच फिर्याद दिली आहे. चोऱ्या रोखण्यासाठी पेट्रोलिंग वाढविली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.