अपघात विमा दावे घोटाळ्यात दहा वकिलांवर ठपका

By admin | Published: June 19, 2017 01:33 AM2017-06-19T01:33:01+5:302017-06-19T01:33:01+5:30

बहुचर्चित अपघात विमा दावे घोटाळ्यात निवृत्त न्यायाधीशांच्या समितीने दहा वकिलांवर ठपका ठेवला आहे. हा चौकशी अहवाल मुंबई उच्च न्यायालय व राज्याच्या मुख्य सचिवांना सादर करण्यात आला आहे.

Blame on ten advocates in the accident insurance claim scam | अपघात विमा दावे घोटाळ्यात दहा वकिलांवर ठपका

अपघात विमा दावे घोटाळ्यात दहा वकिलांवर ठपका

Next

राजेश निस्ताने ।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : बहुचर्चित अपघात विमा दावे घोटाळ्यात निवृत्त न्यायाधीशांच्या समितीने दहा वकिलांवर ठपका ठेवला आहे. हा चौकशी अहवाल मुंबई उच्च न्यायालय व राज्याच्या मुख्य सचिवांना सादर करण्यात आला आहे.
‘लोकमत’ने ७ जानेवारी २०१६ रोजी अपघात विमा दावे घोटाळ्याचा भंडाफोड करण्यात आला. यवतमाळ जिल्ह्यातील अपघाताच्या अनेक प्रकरणांमध्ये एकाच चालकाचे नाव वारंवार आल्याने या घोटाळ्याचे बिंग फुटले. ‘लोकमत’ने त्यावर पुराव्यानिशी वृत्तमालिका प्रकाशित केली. त्याची दखल बार कौन्सिल आॅफ इंडियाने घेऊन, महाराष्ट्र-गोवा बार कौन्सिलला या प्रकरणी चौकशी करण्याचे आदेश दिले. त्यानुसार, बार कौन्सिलने धुळे येथील सेवानिवृत्त जिल्हा व सत्र न्यायाधीश बी. डी. कापडनीस आणि यवतमाळ येथील सेवानिवृत्त जिल्हा व सत्र न्यायाधीश विद्या खरे यांची चौकशीसाठी नियुक्ती केली. बी. डी. कापडनीस यांच्या चौकशी अहवालात एक-दोन नव्हे, तर तब्बल दहा वकिलांवर ठपका ठेवण्यात आला आहे. त्यात वाशिमचे तीन, परभणी दोन तर हिंगोलीच्या पाच वकिलांचा समावेश आहे. डॉक्टर, पोलीस अधिकारी, विमा कंपन्यांचे अधिकारी, सर्व्हेअर, मोटर अपघात दावेदार यांच्याशी संगनमत करून, अपघात विमा दाव्यात भ्रष्टाचार झाल्याचे अहवालात नमूद आहे.

Web Title: Blame on ten advocates in the accident insurance claim scam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.