पुण्यातील स्फोट हा दहशतवादी हल्लाच!
By Admin | Published: July 12, 2014 01:13 AM2014-07-12T01:13:47+5:302014-07-12T01:13:47+5:30
फरासखाना पोलीस ठाण्याच्या आवारात झालेला बॉम्बस्फोट हा दहशतवादी हल्लाच असल्याचे दहशतवाद विरोधी पथकाने स्पष्ट केले आहे.
पुणो : फरासखाना पोलीस ठाण्याच्या आवारात झालेला बॉम्बस्फोट हा दहशतवादी हल्लाच असल्याचे दहशतवाद विरोधी पथकाने स्पष्ट केले आहे. यामागे कोणती दहशतावदी संघटना आहे, याबाबत मात्र तपास अधिका:यांनी मौन बाळगले आहे. परंतु तपासाची दिशा इंडियन मुजाहिदीनवर केंद्रित झालेली असून स्फोटांमध्ये मराठवाडा कनेक्शन असण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
गुरुवारी दुपारी दोनच्या सुमारास फरासखाना पोलीस ठाण्यासमोर पार्किगमधील मोटरसायकलमध्ये स्फोट झाला. स्फोटासाठी वापरलेली मोटारसायकल साता:यातून चोरलेली असून ती एका पोलीस कर्मचा:याची आहे.त्याच्याकडे शुक्रवारी एटीएसच्या वरिष्ठ अधिका:यांनी विचारपूस केली. गुरुवारी रात्री पुण्यात दाखल झालेल्या दहशतवाद विरोधी पथकाचे प्रमुख हिमांशू रॉय यांनी एटीएसच्या वरिष्ठ अधिका:यांची बैठक घेतली. पोलिसांनी दगडुशेठ हलवाई मंदिर, पोलीस ठाणो परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहे. घटनास्थळाजवळच्या एका इमारतीमधून उपलब्ध झालेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दोन संशयितांची छबी टिपली गेल्याचे दिसत आहे. (प्रतिनिधी)
टोलनाक्यावरील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यावर भर
सातारा : पुण्यातील बॉम्बस्फोटात वापरण्यात आलेली दुचाकी साता:यातील पोलिसाची असल्याचे समोर आल्यानंतर तपासाचा केंद्रबिंदू सातारा झाला आहे. एटीएस तसेच पुणो क्राइम ब्रँचही साता:यात दाखल झाली आहे.