धन्य आजि दिन सोनियाचा!
By admin | Published: July 9, 2014 01:43 AM2014-07-09T01:43:33+5:302014-07-09T01:43:33+5:30
लाखो वैष्णवजनांच्या उपस्थितीत बुधवारी आषाढी एकादशीचा महासोहळा होणार आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे पहाटे अडीच वाजता शासकीय महापूजा करणार आहेत.
Next
जगन्नाथ हुक्केरी -पंढरपूर
पावलों पंढरी वैकुंठभुवन।
धन्य आजि दिन सोनियाचा ।
..पावलों पंढरी पार नाहीं सुखा।
भेटला हा सखा मायबाप।..
पंढरीत संतसज्जांचा मेळा जमला असून, लाखो वैष्णवजनांच्या उपस्थितीत बुधवारी आषाढी एकादशीचा महासोहळा होणार आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे पहाटे अडीच वाजता शासकीय महापूजा करणार आहेत. सहा लाखांहून अधिक भाविकांची मांदियाळी असल्याने चंद्रभागा वाळवंटात तर भक्तांची दाटी झाली आहे.
मैलोन्मैल पायी प्रवास करीत संतांच्या पालख्या मंगळवारी सायंकाळी रिंगण, खेळ, धावा करीत लाडक्या सावळ्या विठूरायाला भेटण्यासाठी पंढरीत दाखल झाल्या आहेत. सध्या पाऊस पडत असला तरी तत्पूर्वीच्या दुष्काळी स्थितीमुळे यंदा वारक:यांची संख्या कमी आहे; पण पालख्या पंढरीत दाखल होताच पावसाने दमदार हजेरी लावल्याने वारक:यांमध्ये आनंद आहे. मोठय़ा प्रमाणात वारकरी दर्शन रांगेत थांबल्याने दर्शनासाठी 1क् तासांचा कालावधी लागत आहे.
सोड देवा मौन
चंद्रभागेतीरी, भक्तीचा पूर
कसे एकाएकी, आटले आभाळ
देवा तुङया भेटी, आणिला निवृत्ती
तरी का दुष्काळ, रानोमाळ
भक्त जागोजागी, घालिती रिंगण
कोरडे अंगण, का करिशी आबाळ
ढग झाले आता, वा:याला फितूर
बळीराजा आतूर, नको अशी वेळ
धोंडी धोंडी पाणी, मागती गोपाळ
तरी पिकला ना, साळमाळ
म्हणो भगवंत, भक्तीचा भुकेला
तू का रे निष्ठुर, सोसवेना कळ
तुटली रे आता, संयमाची माळ,
नको अंत पाहू, उजळ भाळ
सोड देवा मौन, हरपले भान
थकले रे आता, मृदंग-टाळ
तुङया गजरात, दिंडय़ा रे हजर
कोठे लपला तू, वेळ पाळ
टळू नको देऊ, आषाढीची वारी
कर आबादानी, वाढव बळ
- संजय वाघ, नाशिक
पावसासाठी अन्नत्याग
पिलखोड, ता. चाळीसगाव : पावसाने दडी मारल्याने सर्वच जण चिंतेत पडले असून कुणी देवाला साकडे घालत आहे मात्र चाळीसगाव तालुक्यातील सेवानगर तांडा येथील एका वृद्धाने चक्क अन्न व पाणी त्याग केला आहे.