अंध व्यक्तीही होउ शकतात 'इफ्फी'चे प्रतिनिधी
By admin | Published: October 8, 2016 05:25 PM2016-10-08T17:25:54+5:302016-10-08T17:31:04+5:30
एखाद्या अंध व्यक्तीला चित्रपटाची आवड असल्यास त्यांनाही तेवढय़ाच उत्कटतेने चित्रपटाचा अनुभव घेता यावा म्हणून यंदाच्या इफ्फीत खास सोय करण्यात आली आहे.
Next
>ऑनलाइन लोकमत
पणजी, दि. ८ - चित्रपट पाहणे आणि त्याची उत्कष्ट अनुभूती घेणे ही चित्रपटप्रेमींसाठी पर्वणीच असते. मात्र एखाद्या अंध व्यक्तीला चित्रपटाची आवड असल्यास त्यांनाही तेवढय़ाच उत्कटतेने चित्रपटाचा अनुभव घेता यावा म्हणून यंदाच्या इफ्फीत खास सोय करण्यात आली आहे. यंदा अंध व्यक्तींनाही 47व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे प्रतिनिधी होण्याची संधी घेता येईल.
महोत्सव संचलनालयाने युनेस्को दिल्ली आणि सक्षम या संस्थेशी करार असून यंदाच्या इफ्फीत अंध व्यक्तींना चित्रपटांचा अनुभव घेता यावा म्हणून खास व्यवस्था केली आहे. सक्षम या संस्थेतर्फे अंध व्यक्तींसाठी ‘अॅडिओ डिस्क्रीपशन’ हे तंत्र तयार केले आहे. या तंत्रद्वारे काही निवडक चित्रपट पाहण्याची संधी अंध व्यक्तींना लाभणार आहे. पडद्यावर चित्रपट सुरु असताना हे खास तंत्र अंध व्यक्तींकडे देण्यात येईल. याद्वारे चित्रपट सुरु असताना पडद्यावर काय सुरु आहे, घटनेबाबतची अनुभूती, वेषभूषा, कलाकारांच्या चेह:यांवरील हावभाव, शरीराची भाषा तसेच दोन संवादांमधील निशब्द: वर्णय याची अनुभूती अंध प्रेक्षकांना घेता येईल.
सक्षम संस्थेने आतापर्यंत 22 चित्रपटांचे ऑडिओ डिस्क्रीपशन केले आहे. चित्रपट सुरु असताना अंध व्यक्तींना सदर यंत्रे मोफत देण्यात येतात. या उपक्रमाला यापूर्वी प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद लाभला आहे असा दावा संस्थेने केला आहे. खालील चित्रपटांचे ऑडिओ ड्रिस्क्रीपनशन केले आहे.
ब्लॅक, मुन्नाभाई एमबीबीएस, हनुमान, काट काट काड कड्ड, करामती कोट, कभी पास कभी फेल, तारे जमी पर, तेलगू अमूल्यम, तामिळ देवात ट्रमंगाय, स्टेनली का डब्बा, तामिळ हरीदास, हिडा होंडा, चक्कड बक्कड बम्बे बो, हॅलो, लिटल टेररिस्ट, बर्फी, थ्री इडियट, पिपली लाईव्ह, धोबी घाट, भाग मिल्खा भाग, पी.के, गांधी या चित्रपटांचा समावेश आहे.
चित्रपट ऑडिओ डिस्क्रीपशन या व्यतिरिक्त सक्षमतर्फे विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. दिव्यांगांना आपले संस्कृती, पुरातन वारसा स्थळे यांची ओळख व्हावी तसेच सहजतेने त्याची माहिती मिळावी यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. तसेच त्यांना कला, नृत्य शिक्षण घेता यावे म्हणूनही काही उपक्रम करण्यात येत आहेत. टेक्नोलॉजी सोल्यूशन सेंटर, टॉकिंग बुक, श्क्षिणासाठी करमुक्त कर्ज, जुन्या वारशांचे संरक्षण आणि संवर्धन असे उपक्रम राबविण्यात येतात.
(प्रतिनिधी)