अंधत्व निवारण कार्यक्रमाला खीळ!

By admin | Published: September 4, 2016 01:10 AM2016-09-04T01:10:40+5:302016-09-04T01:10:40+5:30

कोणत्याही व्यक्तीला कोणत्याही कारणामुळे अंधत्व येऊ नये आणि जर आलेच तर ती व्यक्ती कायम अंध राहू नये, यासाठी राज्यात राष्ट्रीय अंधत्व निवारण कार्यक्रमाला २०१०पासून

Blind prevention program! | अंधत्व निवारण कार्यक्रमाला खीळ!

अंधत्व निवारण कार्यक्रमाला खीळ!

Next

- सुमेध वाघमारे,  नागपूर

कोणत्याही व्यक्तीला कोणत्याही कारणामुळे अंधत्व येऊ नये आणि जर आलेच तर ती व्यक्ती कायम अंध राहू नये, यासाठी राज्यात राष्ट्रीय अंधत्व निवारण कार्यक्रमाला २०१०पासून विशेष सुरुवात झाली. सुरुवातीला नेत्रोद्दीपक कामगिरी बजावलेल्या या कार्यक्रमाला गेल्या वर्षापासून काही प्रमाणात खीळ बसली आहे. लेन्स, चष्मे व औषधांचा तुटवडा पडल्याने गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी मोतिबिंदूच्या तब्बल एक लाख शस्त्रक्रिया कमी झाल्यात. परिणामी, आता या कार्यक्रमालाच शस्त्रक्रियेची गरज असल्याचे बोलले जात आहे.
राष्ट्रीय अंधत्व निवारण कार्यक्रमांतर्गत २०२०पर्यंत अंधत्वाचे प्रमाण ०.३ टक्के इतके खाली आणण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. डोळ्यांबाबत उच्च दर्जाची सेवा उपलब्ध करून देणे, अंधाचे सर्वेक्षण करणे, मोतिबिंदू शस्त्रक्रिया करणे व शालेय विद्यार्थ्यांची तपासणी करून दृष्टिदोष आढळलेल्या विद्यार्थ्यांना चष्मापुरवठा करणे आदींचा या कार्यक्रमात समावेश आहे. तसेच ११व्या पंचवार्षिक योजनेनुसार डायबेटिक रेटिनोपॅथी, काचबिंदू व्यवस्थापन, बुब्बुळ प्रत्यारोपण, व्हिट्रोरेटायनल सर्जरी व बालपणातील अंधत्व यांचा आर्थिक मदतीसाठी समावेश करण्यात आला आहे.
मोतिबिंदूमुळे येणारे अंधत्व रोखण्याला प्राधान्य देऊन २००९-१०पासून ही विशेष मोहीम राबविण्यास सुरुवात झाली. वार्षिक ७ लाख २५ हजार मोतिबिंदूच्या शस्त्रक्रिया करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले. तीन वर्षे शंभर ते १०० टक्के उद्दिष्ट पार पाडण्यात आले, तर २०१३-१४ साली ८ लाख ९ हजार १२ शस्त्रक्रिया, २०१४-१५मध्ये ८ लाख ८ हजार ५३५ शस्त्रक्रिया करण्यात आल्या. ही कामगिरी नेत्रोद्दीपक अशीच आहे, मात्र आता जी आकडेवारीमध्ये घसरण झाली ती धक्कादायकच आहे. २०१५-१६मध्ये ७ लाख ६ हजार १३८ शस्त्रक्रियाच होऊ शकल्या. तब्बल १ लाख २ हजार ३९७ शस्त्रक्रिया कमी झाल्या.
नागपूर उपसंचालक आरोग्य विभागाअंतर्गत पाच जिल्ह्यांचा जर विचार केला तर २०१४-१५मध्ये २४, १६० शस्त्रक्रिया झाल्या तर २०१५-१६मध्ये २०,५१० शस्त्रक्रिया झाल्या. ३,६५० शस्त्रक्रिया कमी झाल्या.
या कार्यक्रमांतर्गत उपसंचालक आरोग्य विभागाला लेन्स, चष्मे व औषधांचा साठा मागणीच्या तुलनेत फारच कमी मिळाला. यामुळे ही संख्या कमी झाल्याचे सांगण्यात
येते.

साहित्याचा ठणठणाट
नागपूरच्या आरोग्य विभागात सध्याच्या स्थितीत सर्वच साहित्याची कमतरता आहे. परिणामी, नागपूरच्या मेडिकल कॉलेजमध्ये राष्ट्रीय अंधत्व निवारण कार्यक्रमांतर्गत मोतीबिंदूच्या शस्त्रक्रिया करणे बंद झाले आहे. अशीच स्थिती राज्यातील इतरही ठिकाणची आहे.

राज्यात मोतीबिंदूच्या
झालेल्या शस्त्रक्रिया
वर्षेसंख्या
२०१३-१४८०९०१२
२०१४-१५८०८५३५
२०१५-१६७०६१३८

Web Title: Blind prevention program!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.