रेल्वेचा ब्लॉक; मुंबई-चेन्नईसह आठ गाड्या रद्द
By Appasaheb.patil | Published: November 21, 2019 01:08 PM2019-11-21T13:08:39+5:302019-11-21T13:11:23+5:30
सोलापूर-वाडी सेक्शनमधील कलबुर्गी आणि सावळगी स्थानकादरम्यान नॉन इंटरलॉकचे काम घेतले हाती.
सोलापूर : मध्य रेल्वेमधील सोलापूर विभागातील सोलापूर-वाडी सेक्शनमधील कलबुर्गी आणि सावळगी स्थानकादरम्यान नॉन इंटरलॉकचे काम हाती घेण्यात आले आहे. या कामामुळे आठ गाड्या रद्द तर तीन गाड्यांच्या मार्गात बदल करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे.
मध्य रेल्वेमधील सोलापूर विभागात मागील बºयाच वर्षांपासून दुहेरीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. सद्यस्थितीला ६० ते ७० टक्के दुहेरीकरणाचे काम पूर्णत्वास आले आहे़ अद्याप काही अंतर हे काम अपूर्ण आहे़ आता कलबुर्गी व सावळगी स्थानक परिसरातील दुहेरीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे़ यासाठी नॉन इंटरलॉकचे काम हाती घेतले आहे़ त्यामुळे या कामामुळे आठ गाड्या रद्द तर तीन गाड्यांच्या वेळापत्रकात बदल केला आहे.
या गाड्या झाल्या रद्द...
- - गाडी क्रमांक ११०२७ मुंबई-चेन्नई मेल
- - गाडी क्रमांक ११०२८ चेन्नई-मुंबई मेल
- - गाडी क्रमांक १६५०१ अहमदाबाद-यशवंतपूर एक्सप्रेस
- - गाडी क्रमांक १६५०२ यशवंतपूर-अहमदाबाद एक्सप्रेस
- - गाडी क्रमांक २२६०१ चेन्नई-साईनगर एक्सप्रेस
- - गाडी क्रमांक २२६०२ साईनगर-चेन्नई एक्सप्रेस
- - गाडी क्रमांक १९५६७ तुतिकोरील-ओखा एक्सप्रेस
- - गाडी क्रमांक १९५६८ ओखा-तुतिकोरील एक्सप्रेस
या गाड्यांच्या मार्गात केला बदल
- - गाडी क्रमांक ११०४१ मुंबई-चेन्नई एक्सप्रेस ही गाडी सोलापूर-होटगी-गदग-गुंटकलमार्गे धावणार आहे.
- - गाडी क्रमांक ११०४२ चेन्नई-मुंबई एक्सप्रेस ही गाडी गुंटकल-गदग-होटगी-सोलापूरमार्गे धावणार आहे.
- - गाडी क्रमांक २२६०२ साईनगर-चेन्नई एक्सप्रेस ही गाडी मनमाड-परभणी-परळी-विकाराबाद-सुलेहाली यामार्गे धावणार आहे.