घोड्यांच्या रक्तजल नमुन्यात ‘ग्लँडर्स’ रोगाचे लक्षण!

By admin | Published: May 25, 2017 01:35 AM2017-05-25T01:35:03+5:302017-05-25T01:35:03+5:30

जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश : अश्ववर्गीय जनावरांच्या वाहतुकीवर बंदी

Blood glucose model of 'Glanders' disease symptoms! | घोड्यांच्या रक्तजल नमुन्यात ‘ग्लँडर्स’ रोगाचे लक्षण!

घोड्यांच्या रक्तजल नमुन्यात ‘ग्लँडर्स’ रोगाचे लक्षण!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : जिल्ह्यातील दोन तालुक्यांत पाच घोड्यांच्या रक्तजल नमुन्यात ‘ग्लँडर्स’ रोगाची लक्षणे आढळली आहेत. त्यामुळे या रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी जिल्ह्यात अश्ववर्गीय जनावरांच्या वाहतुकीवर बंदी घालण्यात येत असल्याचा आदेश जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय यांनी बुधवारी दिला.
जिल्ह्यातील अकोला तालुक्यात दोन आणि मूर्तिजापूर तालुक्यात तीन अशा एकूण पाच घोड्यांच्या रक्तजल नमुन्यात ग्लँडर्स रोगाची लक्षणे आढळून आली आहेत. ग्लँडर्स या रोगाची लागण मानवास होत असून, हा रोग प्राणघातक आहे.
अश्ववर्गीय जनावरांना या रोगाची लागण होऊ नये, या दृष्टीने कायद्याच्या कलम ७ नुसार जिल्ह्यातील अश्ववर्गीय जनावरांच्या वाहतुकीवर निर्बंध घालणे आणि जिल्ह्याबाहेरील अश्ववर्गीय घोडा, खेचरे, गाढव इत्यादी जनावरांसाठी जिल्ह्यात प्रवेश मनाई करणे आवश्यक आहे.
त्यानुसार अकोला जिल्ह्यात इतर जिल्ह्यातून होणाऱ्या अश्ववर्गीय जनावरांच्या वाहतुकीवर आणि अकोला जिल्ह्यातून बाहेरच्या जिल्ह्यात होणाऱ्या अश्ववर्गीय जनावरांच्या वाहतुकीवर बंदी घालण्यात येत असल्याचा आदेश जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय यांनी दिला आहे.

जिल्ह्याबाहेर चारा वाहतुकीवर बंदी!
भविष्यात जिल्ह्यात चारा टंचाईची परिस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी जिल्ह्याबाहेर चारा वाहतुकीवर बंदी घालण्यात येत असल्याचा आदेश जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी बुधवारी दिला. भविष्यात निर्माण होणाऱ्या वैरण टंचाई काळात जिल्ह्यातील उपलब्ध चारा सुरक्षित राहावा, त्यासाठी जिल्ह्यातून लगतच्या जिल्ह्यामध्ये चारा वाहतुकीवर निर्बंध घालणे तसेच लगतच्या जिल्ह्यातून चराईकरिता येणाऱ्या गुराढोरांचा जिल्ह्यात प्रवेश होऊ न देणे कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी आवश्यक आहे. त्यामुळे जिल्ह्यातील उपलब्ध चारा जिल्ह्याबाहेर नेण्यास निर्बंध घालण्यात येत असल्याचा आदेश जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी दिला. त्यानुसार जिल्ह्यातील चारा जिल्ह्याबाहेर वाहतूक करण्यास बंदी घालण्यात आली आहे.

चराईसाठी जिल्ह्याबाहेरील गुराढोरांना प्रवेश बंदी !
जिल्ह्यात चराईसाठी लगतच्या इतर जिल्ह्यातून येणाऱ्या गुरा-ढोरांना अकोला जिल्ह्यात प्रवेश करण्यास बंदी घालण्यात येत असल्याचा आदेशही जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे.

Web Title: Blood glucose model of 'Glanders' disease symptoms!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.