समलैंगिक संबंध ठेवण्यास नकार दिल्याने केला खून

By Admin | Published: May 7, 2016 02:13 PM2016-05-07T14:13:43+5:302016-05-07T14:13:43+5:30

शुभम वाघुलेचा खून सुशिलने समलैंगिक संबंध ठेवण्यास नकार दिल्याने केला असल्याची कबुली दिली

The blood of the person refused to have sex | समलैंगिक संबंध ठेवण्यास नकार दिल्याने केला खून

समलैंगिक संबंध ठेवण्यास नकार दिल्याने केला खून

googlenewsNext
>सुशिल दाभाडेला अखेर अंबडमधून जेरबंद केले
औरंगाबाद (प्रतिनिधी) – शुभम वाघुलेचा खून सुशिलने समलैंगिक संबंध ठेवण्यास नकार दिल्याने केला असल्याची कबुली दिली असून, सुशिलला अंबड येथील त्याच्या नातेवाईकांच्या घरातुन बेगमपूरा पोलिसांनी अटक केली असल्याची माहिती सहाय्यक पोलिस आयुक्त खुशालचंद बाहेती यांनी दिली. 
या बाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनूसार, हर्सूल परिसरातील लहुनगर येथे राहणाऱ्या शुभम अनिल वाघुले यास गुरूवारी दूपारी सुशिल दाभाडे, रा.सिध्दार्थनगर याने त्याच्या बहिण राहत असलेल्या जयभीमनगर येथील घरी बोलविले होते. या ठिकाणी दोघांनी मद्यप्राशन केल्यानंतर सुशिलने शुभमचा हाताच्या नसा कापून तसेच गळा, पोट आणि गुप्तांवर चावूâने वार करून गंभीर जखमी केले होते. त्याला उपचारासाठी घाटी रूग्णालयात दाखल केले असता काल सकाळी तो मरण पावला होता. शुभमवर हल्ला केल्यानंतर सुशिल हा घटनास्थळावरून पसार झाला होता. त्यामुळे या खुना मागचे गुढ स्पष्ट झाले नव्हते. बेगमपूरा पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक शेख् सलिम, उपनिरिक्षक रोडे व त्यांच्या सहकारी हे सुशिलच्या मागावर होते. मात्र, परवा रात्रीपासून तो पोलिसांना हुलकावणी देत होता. तो अंबड येथील आपल्या नातेवाईकांकडे असल्याची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी तात्काळ अंबडला जावून सुशिलला ताब्यात घेतले. पोलिस चौकशीत सुशिलने शुभमसोबत त्याचे समलैंगीक संबंध होते. गुरूवारी दूपारी मी त्याला कॉकटेल दारू पाजल्यानंतर त्याने माझ्यासोबत एकदाच संबंध ठेवले. त्यानंतर त्याला विनंती करूनही तो ऐकण्यास तयार नसल्याने झोपून गेल्यानंतर मी त्याचे हातपाय बांधुन खून केला. आमच्या दोघांचे संबंध गेल्या दीड वर्षांपासून असल्याची कबुलीही त्याने दिली. विशेष म्हणजे शुभमचा खुन केल्यानंतर सुशिलने थंड डोक्याने आंघोळ करून काही झाले नसल्याचा आव आणीत घराला कुलूप लावून निघून गेला होता, अशी माहिती सहाय्यक पोलिस आयुक्त खुशालचंद बाहेती यांनी पत्रकारांशी बोलतांना दिली.

Web Title: The blood of the person refused to have sex

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.