तीक्ष्ण हत्याराने तरुणाचा खून

By admin | Published: October 21, 2016 05:39 PM2016-10-21T17:39:55+5:302016-10-21T17:39:55+5:30

घरातून बाहेर पडलेला एक २६ वर्षीय युवक गुरुवारी रात्री परतला नसल्याने नातेवाईकांनी शोध घेतला. मात्र तो आढळला नाही.

The blood of the young man with a sharp weapon | तीक्ष्ण हत्याराने तरुणाचा खून

तीक्ष्ण हत्याराने तरुणाचा खून

Next

ऑनलाइन लोकमत
लातूर, दि. २१ : घरातून बाहेर पडलेला एक २६ वर्षीय युवक गुरुवारी रात्री परतला नसल्याने नातेवाईकांनी शोध घेतला. मात्र तो आढळला नाही. दरम्यान, शुक्रवारी सकाळी त्याचा तीक्ष्ण हत्याराने वार करून खून केल्याचे आढळले. ही घटना शहरातील टागोर नगर परिसरात घडली आहे.

सूरज गणपत अंकुशे (वय २६, रा. कॉईल नगर, लातूर) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. सूरज अंकुशे हा गुरुवारी सकाळी ८ वाजता घरातून बाहेर पडला होता. नेहमीप्रमाणे तो सायंकाळी घरी परतला नाही. त्यामुळे नातेवाईकांनी त्याचा शोध घेतला. पण तो कुठेच आढळून आला नाही. तो शहरातील मार्केट यार्ड परिसरात मिळेल ती कामे करीत असे. त्यामुळे नातलगांनी या परिसरात शोधाशोध केली. परंतु, त्याचा पत्ताच लागला नाही.

सूरज हा कोठे तरी गेला असेल. सकाळी परत येईल, अशा अपेक्षेने नातेवाईक होते. दरम्यान, शुक्रवारी सकाळी सूरजचा मृतदेह शहरातील टागोर नगर परिसरातील सूर्यमुखी हनुमान प्रतिष्ठानच्या उद्यानात आढळून आला. त्याच्या शरीरावर तीक्ष्ण हत्याराने दहा ते अकरा वार करण्यात आले आहेत. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच शिवाजी नगर पोलिसांनी घटनास्थळाकडे धाव घेऊन पाहणी केली असता धारदार शस्त्राने खून करण्यात आले असल्याचे निदर्शनास आले. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.

नातलगांकडून आक्रोश...
नेहमीप्रमाणे सूरज हा गुरुवारी सकाळी घराबाहेर पडला होता. तो परतला नसल्याने आम्ही शोधाशोध केली. मात्र तो सापडला नाही. सूरज हा भोळसर स्वभावाचा होता. त्यामुळे त्याचे कोणाशीही वैर असू शकत नाही, असे सूरजची मावशी वच्छला गायकवाड यांनी सांगून आक्रोश करण्यास सुरुवात केली. सूरज याच्या पश्चात आई, दोन बहिणी, तीन भाऊ असा परिवार आहे.

Web Title: The blood of the young man with a sharp weapon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.