कडाक्याच्या उन्हात पसरली बेशरमची हिरवाई
By Admin | Published: March 31, 2017 05:16 PM2017-03-31T17:16:18+5:302017-03-31T17:44:11+5:30
ब्रम्हानंद जाधव बुलडाणा, दि. 31: बुलडाणा शहराची जीवनरेषा असलेल्या ऐतिहासिक येळगाव धरणाचे सौंदर्य बेशरममध्ये बुडाल्याचे दिसून येत आहे. संपुर्ण ...
ब्रम्हानंद जाधव
बुलडाणा, दि. 31: बुलडाणा शहराची जीवनरेषा असलेल्या ऐतिहासिक येळगाव धरणाचे सौंदर्य बेशरममध्ये बुडाल्याचे दिसून येत आहे. संपुर्ण शहराची तहान भागविणाऱ्या या येळगाव धरणात कडाक्याच्या उन्हात बेशरमची हिरवाई पसरल्याने धरणाचे अस्तिव धोक्यात सापडले आहे. तसेच जिल्ह्यातील इतर धरणांमध्येही बेशरम सारख्या वनस्पती व झुडूपांचे प्रमाण वाढल्याने
धरणाच्या भिंतीला धोका पोहचू शकते. बुलडाणा शहराची ऐतिहासीक तलाव व धरणाने एक ओळख निर्माण केलेली आहे. सध्या
बुलडाणा शहराला येळगाव पाणी पुरवठा होतो. शहरवासीयांची तहान भागविण्यासाठी येळगाव धरणावर पाणी शुद्धीकरणासाठी मोठा प्रकल्प उभारण्यात आलेला आहे. ऐतिहासीक येळगाव धरण हे बुलडाणा शहराची जीवनरेषा समजली जात असून, यासाठी वारंवार शासनस्तरावरू निधीही दिल्या जातो. गतवर्षी या धरणातील गाळ काढण्यात आल्याने यावर्षी येळगाव धरण १०० टक्के भरले आहे. मात्र, येळगाव धरणावर बेशरम ही वनस्पती मोठ्या प्रमाणावर उगवली आहे. कडाक्याच्या उन्हात येळगाव धरणावरील बेशरम वनस्पती हिरवाईचा शालू पांघरलेली दिसते. बेशरमबरोबरच इतर काटेरी झुटूपे व झाडेही धरणाच्या काठावर वाढल्याने धरणाचे अस्वित्व धोक्यात सापडले आहे. तसेच जिल्ह्यातील इतर धरण, तलाव व नद्यांमध्ये अशाच प्रकारचे झाडे व झुडूपांचे प्रमाण
वाढले आहे. त्यामुळे काही धरणांच्या भिंतीला तर तडे गेलेले आहेत. त्यामुळे संपुर्ण शहराची तहान भागविणाऱ्या या धरणावरिल बेशरमची विल्हेवाट लावण्याची गरज निर्माण झाली आहे.
https://www.dailymotion.com/video/x844vha